पिंपरीत काँग्रेसला मोठा धक्का; विधानपरिषदेसाठी डावलल्याने सचिन साठे यांचा तडकाफडकी राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 07:39 PM2020-11-11T19:39:50+5:302020-11-11T19:41:43+5:30

पुण्यातील काँग्रेसची ताकद वाढावी यासाठी आमदारकीची संधी मिळावी एवढीच अपेक्षा होती.

'Big' stroke to Congress! Pimpri chinchwad congress city president Sachin Sathe's resigns | पिंपरीत काँग्रेसला मोठा धक्का; विधानपरिषदेसाठी डावलल्याने सचिन साठे यांचा तडकाफडकी राजीनामा

पिंपरीत काँग्रेसला मोठा धक्का; विधानपरिषदेसाठी डावलल्याने सचिन साठे यांचा तडकाफडकी राजीनामा

Next

पिंपरी : गेल्या पंधरा वर्षांत शहरातील काँग्रेसला न्याय मिळालेला नाही. विधानपरिषद निवडणूकीत डावलल्याने पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी  राजीनामा दिला आहे. मात्र, ‘‘वैयक्तिक कारणास्तव जबाबदारीतून मुक्त होत आहे, असे साठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
राज्यात भाजपाचे सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीने सरकार स्थापन केले. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेसाठी नावे द्यायची होती. त्यात काँग्रेसच्या वतीने शहराला संघटन वाढविण्यासाठी आमदारकीची संधी मिळावी, काँग्रेसची इच्छा होती. मात्र, आमदारांमध्ये शहरातील काँग्रेसच्या सदस्यांचा समावेश नाही. त्यामुळे शहराध्यक्ष साठे यांनी राजीनामा दिला आहे.


..............................................................
अन्याय झाल्याने नाराजी
साठे मागील सहा वर्षांपासून शहर काँग्रेसचे नेतृत्व करत होते. पडत्या काळात त्यांच्याकडे पक्षाची धुरा आली होती. त्यांनी विविध आंदोलने करुन शहरात पक्ष जिवंत ठेवला.  राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यानंतर न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, डाववल्याने राजीनामा दिला आहे.
...................................
पत्रकार परिषदेस माजी महापौर कविचंद भाट, काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, महिला अध्यक्ष गिरीजा कुदळे, सेवा दलाचे संग्राम तायडे, विष्णपंत नेवाळे, श्याम आगरवाल, राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते.
...............................................
गेल्या २४ वर्षांपासून पक्षाचे काम करत आहे. विद्यार्थी, युवक संघटनेपासून काम करत आहे. सहा वर्षांपासून शहराध्यक्ष म्हणून काम करत होतो. तन,मन धनाने पक्षाचे काम केले.  वैयक्तिक कारणास्तव या जबाबदारीतून मुक्त होत आहे. यापुढे देखील पक्षाचे काम निष्ठेने करणार आहे. मी विधानपरिषदेची उमेदवारी निश्चितपणे मागितली होती. पण संधी नाही मिळाली.
-सचिन साठे, शहराध्यक्ष काँग्रेस

Web Title: 'Big' stroke to Congress! Pimpri chinchwad congress city president Sachin Sathe's resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.