पुणे: दानशुरपणात रतन टाटा, अझीम प्रेमजींचा हात कोणही धरू शकणार नाहीत. कोरोना युद्धात मदत करणाऱ्या जगभरातील हस्तींमध्ये प्रेमजींचा तिसरा नंबर लागतो. याच प्रेमजींना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिलेला शब्द खरा केला आहे. प्रेमजी यांनी भारतातील पहिले केवळ कोरोना विरोधात लढण्यासाठी हॉस्पिटल उभारले आहे.
पुण्यामध्ये हे हॉस्पिटल उभारण्यात आले असून यामध्ये सार्वजनिक-खासगी सहकार्यातून उपचार करण्यात येणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये 450 अद्ययावत बेड्स असणार असून 18 व्हेंटिलेटर आणि आयसीयू विभाग असणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गौरवोद्गार काढले असून विप्रो दोन सुसज्ज अॅम्बुलन्स पुरवित असल्याचे म्हटले आहे. तसेच कोरोनाचे हॉस्पिटल हे कोरोना हेल्थ सेंटर म्हणून ओळखले जाईल असे म्हटले आहे. हे हॉस्पिटल पुण्यातील हिंजवडी भागात तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी आयटी पार्क असून विप्रोची भलीमोठी आयटी कंपनीची इमारत आहे. यापैकी 1.8 लाख वर्गफूटाची जागा या हॉस्पिटलसाठी देण्यात आली आहे.
५ मे रोजी विप्रोने राज्य सरकारसोबत सामंज्यस्य करार केला होता. यावेळी त्यांनी दीड महिन्यात कोरोनाशी लढायला हॉस्पिटल उभारणार असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी अझीम प्रेमजींचा मुलगा रिशद प्रेमजी याचे आभार मानले आहेत. गुरुवारी या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.
कसे आहे हे हॉस्पिटल?450 खाटांचे हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल. गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात १२ खाटा उपलब्ध असतील. हे कोविड १९ साठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स असेल. येथे नियुक्त केलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या विशेष संकुलात २४ उत्तम खोल्यांची व्यवस्थाही असेल.
कोरोना संकटाशी लढण्यासाठी मुक्तहस्ते मदतविप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने कोविड १९ विरुद्ध लढतांना या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत ११२५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. कोरोना विषाणुचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव रोखण्यासाठी मदतीच्या रुपाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या संसाधनांचा नक्कीच उपयोग होईल व त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्र सक्षम होण्यास देखील मदत मिळेल. सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणाऱ्या विप्रो आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशनने मुंबई, पुणे, औरंगाबाद वाळूज, अमळनेर, अहमदनगर, अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसह देशभरात मदत कार्य केले असून शासनाच्या बरोबरीने कोविड १९ विषाणु विरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत देशातील 34 लाखाहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचली आहे.
दानशूरपणात अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबरकोरोना व्हायरसच्या लढाईत रतन टाटा यांच्यानंतर देशाला मदत करणारे विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांनी जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे. कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यासाठी जगभरातील ८० अब्जाधिशांनी हात सैल केले आहेत. यात प्रेमजी देखील मागे राहिलेले नाहीत. अझीम प्रेमजी यांनी मदतनिधीसाठी खजिनाच ओतला आहे. यामुळे प्रेमजी हे जगातील सर्वाधिक दान देणाऱ्यांमध्ये तिसरे अब्जाधिश ठरले आहेत. पहिल्या क्रमांकावर ट्विटरचे मालक जॅक डॉर्सी असून दुसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारताचे या यादीतील एकमेव अब्जाधिश अझीम प्रेमजी आले आहेत. या तीन व्यक्तींनी जगात सर्वाधिक दान केले आहे. फोर्ब्स मॅक्झिननुसार मार्चनंतर जगातील अब्जाधिशांच्या दान रकमेवर ही यादी बनविण्यात आली आहे. अझीम प्रेमजी यांनी आता पर्य़ंत 132 मिलियन डॉलर म्हणजेच एक हजार कोटी रुपयांचे दान केले आहे. जगभरात 2,095 अब्जाधिश असून त्यांच्यापैकी अनेकांनी अद्याप दान केलेले नाही किंवा त्याची माहिती दिलेली नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या....
अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला
दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश'
CoronaVirus: देश हादरला! गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले; अमित शहा कार्यरत
महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन आयसीयूमध्ये; कोरोना टेस्ट निगेटिव्ह
मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती
आजचे राशीभविष्य - 14 जून 2020; मकर राशीच्या व्यक्तींना प्रिय व्यक्ती भेटेल