आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके, परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, पिंपरीच्या सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आणि बीएचआरच्या प्रमुख तपास अधिकारी सुचेता खोकले. याशिवाय पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, संगीता यादव, अनिता मोरे, सहायक पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे यांच्याकडेही जबाबदारी सोपविण्यात आली होती.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांनी संपूर्ण कारवाईचे नेतृत्व केले. कोठे कोठे छापे मारायचे. त्यासाठी कोणत्या ठिकाणी किती जणांची गरज लागेल. इथपासून पुण्यातून तेथे जायचे कसे, कारवाईसाठी आलेल्यांच्या चहा, नास्ता, जेवणापर्यंतची सोय कशी करायची याचे संपूर्ण नियोजन पुण्यातून निघतानाच करण्यात आले होते. सुमारे १२ वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. त्यातील प्रमुख ४ ते ५ जणांना याची माहिती होती. त्याशिवाय बाकी कोणालाही या कारवाईची फारशी माहिती नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणावर
पोलिसांच्या गाड्या एका मागोमाग जात असल्याचे पाहून कोणालाही संशय येईल म्हणून पोलिसांनी खासगी गाड्या वापरल्या होत्या. या कारवाईची माहिती बाहेर फुटली असती तर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याची शक्यता होती. तसेच आता जे हाती लागले तेही आरोपी सापडले नसते. त्यामुळे गोपनीयता बाळगणे महत्वाचे होते.
पुण्यातून निघून या पथकांनी सकाळी एकाचवेळी जळगाव त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी छापे घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पुणे पोलिसांनी आर्थिक गुन्ह्यांमध्ये एकाचवेळी दुसर्या शहरात इतक्या मोठ्या संख्येने जाऊन केलेली व महिला अधिकार्यांनी नेतृत्व केलेली ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
............
या कारवाईत समन्वय राखत यशस्वी कारवाई
या कारवाई दोन पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, २५ सहायक पोलीस निरीक्षक आणि १०० कर्मचारी असा मोठा ैफाजफाटा होता. सर्वांनी योग्य तो समन्वय राखून ही कारवाई यशस्वी केली. आर्थिक गुन्हे शाखेत महिला अधिकार्यांचे प्रमाण अधिक असल्याने कारवाई त्यांचा सहभागही महत्वाचा ठरला
भाग्यश्री नवटाके, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा.
गोपनीयता राखणे होते सर्वात महत्वाचे
या कारवाईसाठी आमच्या वेगवेगळी पथके करण्यात आली होती. त्यात त्यांना शेवटपर्यंत आपण कोठे कारवाईसाठी जात आहोत, याची कोणालाही माहिती नव्हती. केवळ काही मोजक्या प्रमुख अधिकार्यांना काय कारवाई करायची कोणी कोठे छापे मारायचे, याची माहिती होती. त्यामुळेच ही कारवाई अत्यंत यशस्वी झाली असे वाटते.
प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त, पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
......
प्रेरणा कट्टे याअगोदर कोल्हापूर शहरात कार्यरत होत्या. त्या ठिकाणीही त्यांनी अशीच एक मोठी धाडसी कारवाई केली होती. सुमारे दीड वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये मुंबई मटका वर त्यांनी एकाचवेळी काही ठिकाणी छापे घालते होते. त्यात ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी अजूनही तुरुंगात आहेत.
.......