शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

भडकवण्याचे काम लेखकाचे नव्हे - बिजेंद्र पाल सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 1:16 AM

‘‘लेखकाचे काम हे समाजाला भडकवण्याचे नव्हे तर मनोरंजनाचे आहे. लेखकाला जात धर्म नसतो. समाजातील विविध संवेदनशील विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही लेखकाची आहे.

पुणे  - ‘‘लेखकाचे काम हे समाजाला भडकवण्याचे नव्हे तर मनोरंजनाचे आहे. लेखकाला जात धर्म नसतो. समाजातील विविध संवेदनशील विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही लेखकाची आहे. त्याच्या शब्दांनी जग बदलू शकते, अशा शब्दातं एफटीआयआयचे अध्यक्ष बिजेंद्र पाल सिंग यांनी लेखकांचे महत्व विशद केले.तब्बल २२ वर्षांनी फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेमध्ये पदवी प्रदान समारंभ पार पडला. अंगात केशरी गाऊन, डोक्यावर पुणेरी पगडी...मान्यवरांच्या हस्ते प्रथमच प्रमाणपत्र घेण्याचा अनुभव... विद्यार्थ्यांचे खुललेले चेहरे अशा भारावलेल्या वातावरणात हा पदवीप्रदान सोहळा रंगला. बिजेंद्र पाल सिंग यांच्या हस्ते टिव्ही विभागातील २०१४-२०१५, २०१५-२०१६ आणि २०१७-२०१८ या बँचमधले पदव्युत्तर विद्यार्थी तसेच चित्रपट विभागातील पटकथा लेखन अभ्यासक्रमाच्या २०१६-२०१७ आणि २०१७ -२०१८ बँचच्या अशा एकूण १४८ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.याप्रसंगी एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला, कुलसचिव वरूण भारद्वाज, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम आणि टिव्ही विभागाचे अधिष्ठाता आर एन पाठक उपस्थित होते.’सीआयडी’ मालिकेचे तब्बल १९ वर्षे लेखन करणारे बिजेंद्र पाल सिंग म्हणाले, लेखकांच्या लेखणीमध्येच समाज बदलाचे सामर्थ्य आहे. आज टिव्ही आणि चित्रपट माध्यम बदलले आहे. व्यावसायिक आणि अव्यावसायिक ही दरी कमी झाली आहे. वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट किंवा मालिका बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरत आहेत. हे लेखकांमुळेच शक्य झाले आहे. एखादी मालिका यशस्वी झाली की लेखकांची जबाबदारी वाढते. दुस-याची दु:ख समजण्याची ताकद नसेल तर लेखन क्षेत्रात पुढे जाता येणे शक्य नाही. मी अनेक वर्षे सीआयडी लिहीत होतो. तुम्हाला कंटाळा आला नाही का? असे सातत्याने विचारले जायचे. पण मी जबाबदारी समजून लेखन केले. विविध अभ्यासक्रमांची भूपेंद्र कँथोला यांनी माहिती दिली.मी मूळचा नगर जिल्ह्यातील आहे. त्या भागात एफटीआयआय संस्था आणि अशा प्रकारचे शिक्षण याबद्दल काहीच माहिती नाही. एफटीआयआयमध्ये जे तंत्रशुद्ध शिक्षण मिळते तसे कुठेच दिले जात नाही.- ओंकार परदेशी,विद्यार्थी, टिव्ही एडिटिंगपदवी प्रदान सोहळा हा आमच्यासाठी आनंददायी अनुभव होता. आज आमचे करियर ख-या अर्थाने सुरू झाले आहे.- शताब्दी रॉय,विद्यार्थी व्हिडिओ एडिटिंगमनोरंजन क्षेत्राला कायमच लेखकांची निकड...भारत हा प्रकर्षाने बदलत आहे. त्यामुळे लेखकांना आपण कुणासाठी लिहीत होतो, कुणासाठी लिहायचे आहे हे समजावे लागेल. भाषेत बदल करावा लागेल असा कानमंत्रही त्यांनी विद्याथर््यांना दिला.जगभरात तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. जे आज शिकलो ते भविष्यात उपयोगी पडेलच असे नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत जाणार आहे. पण लेखक आणि दिग्दर्शन क्षेत्राला याचा फटका बसणार नाही. मनोरंजन क्षेत्रात लेखकांची कायमच निकड भासणार आहे. लेखकांची मागणी खूप आहे.हवा तेवढा पुरवठा होत नाही, अशी सध्याची मनोरंजनाची स्थिती आहे. त्यामुळे दिग्दर्शक, निर्माता लेखकांवर अवलंबून आहेत. ते येतील आणि नवीन कल्पना सुचवतील. यासाठी लेखकांनी वाचन, निरीक्षण आणि ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे पाल म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड