शिवणे : कोंढवे धावडे येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. शंकर बबन काळे (वय वर्षे ३१) असे त्यांचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता काळे हे आपल्या दुचाकीवरून कुडजे गावाकडे जात असताना ही घटना घडली. निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल बस चालक कमलाकर पांडुरंग शेवाळे (वय वर्ष २९) यांच्यावर भा द वि कलम २७९ , ३०४ (अ) सह मोटार वाहन अधिनियम ११९/१७७ प्रमाणे उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर , पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे , सहाय्यक पोलीस निरीक्षक डी के पवार घटनास्थळी पोहोचले . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तसेच पोलीस उपनिरीक्षक दिपाली लुगडे करत आहेत.
Accident: पुण्यात पीएमपीएमएलच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 8:46 AM