पुणो : मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील मुलांना सायकली उन्हाळ्याच्या सुट्टीत देण्याची वेळ आली होती. हा अनुभव गाठीशी असतानाही या वर्षी सायकलखरेदीची प्रक्रिया एप्रिल महिन्यातच प्रशासनाकडून सुरू करणो अपेक्षित असताना, प्रत्यक्षात विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून तब्बल आठ महिने उशिराने ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे या वर्षीच्या सायकलीही मुलांना पुन्हा उन्हाळ्यातच हाती पडणार असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील मुलांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महापालिकेकडून सातवी ते दहावीच्या विद्याथ्र्याना सायकल देण्याचा उपक्रम मागील वर्षापासून सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात 1 कोटी 20 लाख रुपयांची आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. या निधीतून सुमारे 3 हजार 500 सायकली घेण्यात येणार आहे. मागील वर्षी प्रशासनाने ही खरेदी करण्यास दिरंगाई केली होती. त्यामुळे सायकली लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकल्या आणि मुलांना त्याचे वाटप शाळेच्या निकालाच्या दिवशी करण्याची वेळ प्रशासनावर आली. या वर्षीही अशीच स्थिती आहे.
मागील वर्षाचा अनुभव पाहता, प्रशासनाने या वर्षीच्या सायकलींची खरेदी प्रक्रिया एप्रिल 2014 पासून सुरू करणो अपेक्षित होते. मात्र, गेले सहा महिने प्रशासनाने काहीच हालचाल न करता, आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ही आचारसंहिता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात संपेल. त्यानंतरच हा प्रस्ताव निविदा मागविणो, स्थायी समितीची मान्यता, मुख्य सभेची मान्यता आणि त्यानंतर प्रत्यक्ष सायकली तयार होणार यात तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे मुलांना सायकली फेब्रुवारीचा शेवटचा अथवा मार्च 2014च्या पहिल्या आठवडय़ात मिळतील. मात्र, त्या वेळी दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने या मुलांना
त्याचा फायदा होणार नाही. तसेच शाळा संपत असल्याने या मुलांना
पुन्हा या सायकली उन्हाळ्याच्या सुट्टीतच मिळतील. (प्रतिनिधी)