पुणे : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याकरिता पालिका प्रशासन दिवसरात्र काम करीत आहे. पालिकेकडे जसे वैद्यकीय मनुष्यबळ कमी होते, तसेच वैद्यकीय साहित्याचीही कमतरता होती. परंतू, विविध सामाजिक संस्था, संघटना, कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यक्तींनी पुढे येत कोट्यवधींचे वैद्यकीय साहित्य पालिकेला पुरविले. सामाजिक दायित्वामधून (सीएसआर) आलेल्या या साहित्यामुळे पालिकेचा कोट्यवधींचा खर्च वाचला आहे.
कोरोनाची साथ आल्यानंतर रुग्णांची संख्याही वाढत गेली.सुरुवातीच्या काळात या आजाराच्या उपचारांसाठी लागणा-या वैद्यकीय साहित्याच्या खरेदीबाबत वेगवेगळे दर दिले जात होते. या काळात साहित्याची निकड असल्याने पालिकेकडून जादा दराने काही साहित्य खरेदीही केले गेले. त्यावरुन मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली. नगरसेवकांकडून आम्हाला ‘हिशोब’ द्या अशी मागणी सातत्याने केली जात होती. एकीकडे खरेदीवरुन वादंग माजलेला असतानाच पालिकेला मात्र, सीएसआरच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला. पालिकेला पीपीई कीटपासून ते अगदी साध्या मास्कपर्यंत आलेले हे साहित्य विविध रुग्णालयांमध्ये, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांसह, स्वच्छता कर्मचारी, अधिकारी यांना पुरविण्यात आले. एवढेच नव्हे तर, अनेकांनी व्हेंटीलेटर, आयसीयू बेड, गोळ्या, थर्मामीटर, आॅक्सिमीटर, एन-९५ मास्कही भरभरुन दिले. हे सर्व साहित्य आरोग्य विभागाच्या स्टोअर विभागामध्ये जमा करण्यात आल्यानंतर तेथून आवश्यकतेनुसार वाटण्यात आले आहे. त्याच्या नोंदीदेखील ठेवण्यात आलेल्या आहेत.====ईसीजी जेली, कव्हेरॉल बॉयलर सूट, गॉगल्स, शुज लेगिंंज, डिस्पोजेबल बॅग्ज, फ्रोजन थंड पाकिटे, होमिओपॅथी गोळ्या (बॉटल्स), नेब्यूलायझर, ईसीजी मशीन, आयसीयूबेड, फोल्डेबल बेड, व्हेंटीलेटर, मॉनिटर, वॉशिंग मशीन, फ्रिज, डेफि ब्रिलेटर, बॉडी बॅग, एअर निगेटीव्ह आयॉन जनरेटर, ऑक्सिजन सिलेंडर, लॅरिन्गोस्कोप, हॅन्डरब, स्वाब बुथ, सीरींज पंप, फोगर मशीन, कर्टन ट्रक, मेडिकल गॅस लाईन विथ बेड हेड पॅनल, बीपीसी विथ फ्लोमीटर विथ हमडिफिअर बॉटल सेट, मायक्रो थेटोस्कोप, व्हिल चेअर, इलेक्ट्रिक सक्शन मशिन, लेरींगोस्कोप एलएडी आदी साहित्यही पुरविण्यात आले आहे. =====व्हटीएम कीट १,११५पीपीई कीट ३८,०२०एन 95 मास्क ३२,९३०डिस्पोजेबल मास्क १,१०,७००कापडी मास्क ११,४१३तीन लेयर मास्क ५३,०००हॅन्डग्लोव्हज २०,५८०सोडियम हायपोक्लोराईड (लि.) १,१६०सॅनिटायझर (लि.) १४,१५५सॅनिटायझर (बाटल्या) ९,४१६ग्लुकोमीटर (स्ट्रिप) ४०००फिंगर पल्स ऑक्स्मििटर २,८१५फेस शिल्ड ८,५२०रेस्प्रिंट १,०००थर्मामीटर ७८२व्हेंटीलेटर २९