आसखेड /पुणे : धरणग्रस्तांचा मोठा विरोध असल्याने अडीच महिन्यांपासून बंद असलेले भामा-आसखेड धरणातील जॅकवेलचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली होती. या योजनेतून पुण्यासाठी अतिरिक्त पाणी मिळणार आहे.पुणे शहराला वाढीव पाणी मिळावे यासाठी खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. मात्र, धरणग्रस्तांनीत्याला विरोध केला आहे. धरणग्रस्तांच्या विविध मागण्या व प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत.त्या मागण्या पूर्ण झाल्यावरच कामसुरू करा, यासाठी धरणग्रस्तांनी आंदोलन उभारलेले होते. तेव्हापासून हे काम बंद होते.सुमारे १४ वर्षांपासून भामा-आसखेड धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. धरण प्रशासन व शासन यांचे त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. ‘आधी पुनर्वसन, मग प्रकल्प’ असे फक्त आश्वासन देऊन धरणग्रस्तांची फसवणूक झाली असल्याची भावना आहे. त्यामुळे तेव्हापासून संतप्त शेतकºयांनी पुण्याला नेण्यात येणाºया पाणी योजनेच्या पाइपलाइनचे काम व जॅकवेलचे काम वेळोवेळी बंद पाडले. धरणग्रस्तांनी जॅकवेलचे कामच बंद पाडले. आज ४ पोलीस निरीक्षक, ११ उपनिरीक्षक, २०० कॉन्स्टेबल अशी मोठी फौज लावून पूर्ण बंदोबस्तात जॅकवेलचे काम सुरू केले. सध्या तरी फक्त पाणी उपसण्याचे काम सुरु केले आहे.येत्या ८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी भामा-आसखेड विश्रामगृहात प्रलंबित प्रश्नांची किती पूर्तता झाली व काय परिस्थिती यासाठी येणार आहे, या सगळ्या बाबींमुळे काम सुरू झाले तरी आंदोलक (बाधित शेतकरी) कोणीही फिरकले नाही. गरज पडलीच, तर पुनर्वसन समितीचे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची दिशा ठरेल.- सुरेश गोरे, (आमदार )येत्या दोन-तीन महिन्यांत सगळे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे काम सुरू झाले असले, तरी तसे न झाल्यास गावोगाव सभा घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.- किसन नवले (बाधित शेतकरी)
पुण्यासाठी भामा-आसखेडचे पाणी : पोलीस फौजफाट्यात जॅकवेलचे काम सुरू, धरणग्रस्तांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 6:07 AM