लोकमत न्यूज नेटवर्कदावडी : भीमा नदीपात्रावर मंजूर झालेला बंधारा निमगाव परिसरात न करता दावडी येथे करावा, अशी मागणी दावडी ग्रामस्थांनी केली आहे. बंधाऱ्यासाठी जी जागा निवडली आहे ती चुकीची असून, दावडी येथे तो झाल्यास पाणीटंचाई व दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.खेड तालुक्यातील पूर्व भागात भीमा नदीवर काळुस व दावडी या भागांना जोडणारा, तसेच शेलपिंपळगाव व कोयाळी यांना जोडणाऱ्या अशा दोन बंधाऱ्यांसाठी चार कोटी रुपये निधी मिळाला आहे. खरपुडी, निमगाव, वाटेकरवाडी, दावडी या परिसरातून भीमा नदी जाते. वाटेकरवाडी, निमगाव या परिसरात दोन बंधारे आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेती व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत नाही. मात्र, दावडी परिसर तसेच माळवाडी, खैरेवस्ती, दौंडकरवाडी, या नदीकाठलगत असणाऱ्या गावांना नदीचे पाणी कमी झाल्यानंतर, पुन्हा धरणातून नदीला पाणी सोडेपर्यंत पिकांना पाणी मिळत नाही. तसेच, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होतो. या परिसराला चासकमान धरणातून सोडलेल्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे दावडी येथील डुंबरे वस्ती (स्मशानभूमी ) ते नदीपलीकडील माळवाडी (चौडाई देवी मंदिर) या नदीपात्रावर बंधारा करावा, अशी मागणी दावडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन, याबाबत आमदार सुरेश गोरे यांना निवेदन दिले आहे. या बधाऱ्यांचा पुन्हा सर्वे करण्यात येणार आहे. सर्वांना या बंधाऱ्यातील पाण्याचा फायदा होईल तसेच या बंधाऱ्यावरील पुलामुळे दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल. सर्व ग्रामस्थांना विचारात घेऊनच भिमा पात्रावर बंधारा बांधण्यात येणार आहे.- सुरेश गोरे, आमदारदावडी -डुंबरे वस्तीलगत बंधारा झाला तर दावडी व दौडकरवाडी, खेसे वस्ती, होरे वस्ती, काळुस परिसरातीत माळवाडी येथील शेती उपयोगी व पिण्याच्या पाण्याची सोय होईल तसेच दावडी गावाला चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. हा दावडी लगत डुंबरे वस्ती जवळच नाहीतरी दावडी ग्रामस्थाच्या वतीने अंदोलन करण्यात येईंल.- वैशाली गव्हाणे, पंचायत समिती सदस्या खेड निमगावच्या हद्दीत वाटेकरवाडी, निमगाव येथे दोन बंधारे आहेत. या परिसरात काही गरज नसताना ५०० मीटरच्या अंतरावर दुसरा बंधारा चुकीचे आहे. आमच्यावर अन्याय होणार असून निमगाव हद्दीत होणाऱ्या बंधाऱ्याला विरोध आहे. - सुरेश डुंबरे , माजी सरपंच, दावडी
निमगावऐवजी बंधारा दावडीत करावा
By admin | Published: May 07, 2017 2:28 AM