पुणे :महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने आभासी पद्धतीने निबंध, चित्रकला, छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त (दि.२२) ही स्पर्धा होत आहे.
मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव पाटील यांनी सांगितले की, ‘आम्ही निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत’ ही यावेळच्या जैवविविधता दिवसाची थिम आहे. शालेय गटासाठी चित्रकलेला माझी आई, माझी वसुंधरा, पोस्टर स्पर्धेला माझे आवडते प्राणी, पक्षी असा विषय आहे.
पदवीधर, पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थी विभागासाठी निबंध स्पर्धेकरता ''जैवविविधता संवर्धन हे कोविड १९ साथीचे उत्तर आहे का ? असा विषय आहे. फोटोग्राफी/ व्हिडीओग्राफी स्पर्धेसाठी वन्यप्राणी हालचालीचे स्थिर, चल चित्रण हा विषय आहे. स्पर्धेच्या अटी नियम प्रवेशिका व अन्य आवश्यक माहितीसाठी इच्छुक स्पर्धकांनी राज्य जैवविविधता मंडळाच्या कार्यालयाशी किंवा राज्य सरकारच्या www.mahaforest.gov.in या संकेस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. आर. डी. चौधरी, सचिव प्रवीण श्रीवास्तव यांनी केले आहे.