प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी बायोफ्लोक उभारणी आणि तंत्रज्ञान याची सखोल माहिती रमेश पवार आणि सूरज अपसिंगे यशस्वी उद्योजक बायोफ्लोक यांनी दिली दुसऱ्या दिवशी गोल्डन बायोफ्लोक फिश फार्म पाचवड सातारा येथे बायोफ्लोकसाठी आखणी ते मत्स्य हार्वेस्टिंग संपूर्ण प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थीकडून करून घेतले. तिसऱ्या दिवशी शेततळ्यातील मत्स्यपालन आणि मासेचे रोग नियंत्रण या विषयांवर चंद्रकांत दाते आणि विक्रांत बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. सहभागी प्रशिक्षणार्थींकरिता के. व्ही. के. तील विविध विभागांची भेट आयोजित करून माहिती दिली स्वागत समारंभ आणि प्रमाणपत्र वितरण डॉ. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये बायोफ्लोक पद्धती मत्स्यपालन प्रशिक्षण देण्यात आले.
१००७२०२१-बारामती-०२