पुणे : द्विलक्षी (बायफोकल) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन गुणपत्रिकेच्या आधारे शाळा सोडल्याचा दाखला देण्यात यावा. तसेच याच गुणपत्रिकेवरून विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश प्राप्त झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जावा, असे आदेश अकरावी प्रवेश समितीने सर्व शाळा व महाविद्यालयांना दिले आहेत.पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार बायफोकल अभ्यासक्रमाची प्रवेश यादी २१ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका येत्या २२ जूनला मिळणार आहेत. त्यापूर्वी बायफोकल विषयाचे पहिल्या यादीनुसार प्रवेश होणार आहेत. मूळ गुणपत्रिका नसल्याच्या कारणावरून बायफोकलच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारू नये, असेही समितीने स्पष्ट केले आहे.अकरावी प्रवेशप्रक्रियेअंतर्गत पुण्यात ८२ हजार ७२१ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यापैकी ७४ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्णपणे भरले आहेत, तर अद्याप ८ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण आहेत. बायफोकल विषयासाठी ५९ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलार्इंन अर्ज केले असून त्यातील ४ हजार ८६१ विद्यार्थ्यांनी अर्ज ‘कन्फर्म’ केला आहे, असे प्रवेश समिती कळविण्यात आले.
आॅनलाईन गुणपत्रिकेवर बायफोकलला प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:21 AM