या वेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा, सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख, रमेश धोत्रे व माजी सैनिक, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या "अटलआनंद घन वन" योजनेअंतर्गत इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने दोन वर्षांपूर्वी दि. १५ ऑगस्ट २०१९ रोजी भार्गवराम बगीच्या शेजारील टाऊन हॉल पाठीमागे २२ गुंठे जागेमध्ये जवळपास दोन हजार विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड एकाच दिवशी केली होती. आज या वृक्षांची मोठी वाढ होऊन, पंचवीस ते तीस फूट उंचीपर्यंत वृक्ष मोठे झाले आहेत. यासाठी शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, तसेच शहरातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी व इंदापूर नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले होते. तर नगरपरिषद कर्मचारी यांनी वर्षभर या वृक्षाची जोपासना केली. या वेळी अल्ताफ पठाण यांनी वृक्ष जोपासण्याची प्रतिज्ञा देऊन, झाडांची जोपासना करण्याची शपथ सर्वांना दिली.
१९ इंदापूर झाडे
इंदापूर शहरातील अटलआनंद घन वनाचा वाढदिवस साजरा करताना नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी मान्यवर.