भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथे कोथींबीरीचे प्रसिद्ध व्यापारी सुरेश शिवरकर यांनी आपल्या शेतात लावलेल्या चिंचेच्या झाडांचा माळशिरस ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिसरा वाढदिवस साजरा करुन वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे याप्रमाणे झाडे लावा हा संदेशच देऊन पुरंदर तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे.
सासवड येथे राहणारे सुरेश शिवरकर कोथींबीरीचा व्यापार करतात. त्यांनी माळशिरस या ठिकाणी जमीन विकत घेतली त्यात १८० चिंचेची झाडे लावली. ज्या दिवशी वृक्षारोपण केले तो दिवस झाडांचा वाढदिवस म्हणुन साजरा केला जातो. चिंचेच्या झाडांच्या मध्ये आकराशे सिताफळांची झाडे लावलेली आहेत. झाडांना उन्हाळ्यात पाणी कमी पडु नये म्हणुन या ठिकाणी शेततळे बांधण्यात आले आहे. या पाण्याद्वारे येथील चिंचेची झाडे जोपासण्यात आली आहेत. शुक्रवारी माळशिरस ग्रामस्थांच्या उपस्थितीत केक कापुन, झाडांना फुगे बांधुन चिंचेच्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके,माजी सरपंच अरुण यादव, बाळासाहेब यादव, सचिन शिवरकर, संदीप शिवरकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय डोंबाळे, दिलीप मोरे, दौंड शुगरचे शेतकी अधिकारी गणेश ढोले, खंडु यादव, बाळकृष्ण झिंजुरके परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट
मी चिंचेचा व्यापार केला आहे. एक चिंचेचे झाड वर्षाला किती उत्पन्न देते याची पुर्ण कल्पना आहे. १८० चिंचेची झाडे ज्यावेळी उत्पन्न देतील ते उत्पन्न आपली पेंशन असेल.
-सुरेश शिवरकर, वृक्षमित्र
कोट
सुरेश शिवरकर यांचे झाडांवरती अतिशय प्रेम आहे. त्यांनी शेतात लावलेली चिंचेची झाडे, दरवर्षी साजरा होणारा झाडांचा वाढदिवस, झाडांविषयी असणारे प्रेम हे समाजाला प्रेरणा देणारे आहे.
- महादेव बोरावके, सरपंच, माळशिरस
फोटो ओळ - माळशिरस येथे चिंचेच्या झाडांचा वाढदिवस साजरा करताना सुरेश शिवरकर व इतर