पुणो : पुण्यामधील काम संपवून मुंबईला जात असताना एसटी बसमध्ये सहप्रवासी म्हणून शेजारी बसलेल्याने खायला दिलेले बिस्कीट आणि चॉकलेट चांगलेच महागात पडले. गुंगीचे औषध असलेले हे बिस्कीट आणि चॉकलेट खाऊन बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला तब्बल तीन दिवसांनी शुद्ध आली. हातातील अंगठी आणि सोनसाखळी असा एकूण 1 लाख 1क् हजारांचा ऐवज चोरटय़ाने गायब केलेला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अजित बागल (वय 4क्, रा. कुर्ला प., मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. बागल हे मूळचे हडपसर येथील राहणारे आहेत. सध्या ते मुंबईमध्ये राहण्यास असून, भिवंडीमधील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करतात. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त ते पुण्यात आले होते. काम संपवल्यानंतर 3क् नोव्हेंबर रोजी दुपारी पावणोतीनच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी ते स्वारगेट एसटी बसस्थानकात आले. त्यांच्या शेजारच्या सीटवर एक जण बसलेला होता.
काही दिवसांपूर्वी वारजे येथील एका महिलेला आणि तिच्या मुलाला प्रसादाचा पेढा खायला देऊन लुटण्यात आले होते. गुंगीचे औषध असलेला हा पेढा खाऊन बेशुद्ध झालेले या दोघांनाही मुंबईच्या एसटी बसमध्ये बसवून देण्यात आले होते.
संध्याकाळी त्यांना शुद्ध आली तेव्हा ते दोघेही ठाण्याच्या बसस्थानकात होते. या महिलेच्या अंगावरील दागिनेही चोरटय़ाने लंपास केलेले होते.
(प्रतिनिधी)
तोंड गोड करण्यासाठी दिले चॉकलेट
4प्रवासादरम्यान भामटय़ाने बिस्कीट खायला दिले. हे बिस्कीट कडवट लागल्यामुळे बागल यांनी ते थुंकले. त्यानंतर तोंड गोड करण्यासाठी या भामटय़ाने चॉकलेट खायला दिले. गुंगीचे औषध असलेले बिस्कीट आणि चॉकलेट खाल्ल्यामुळे बागल बेशुद्ध झाले. संध्याकाळी बस मुंबई सेंट्रल आगारामध्ये आल्यानंतर बेशुद्धावस्थेत असलेल्या बागल यांना एसटीच्या कर्मचा:यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यांना तीन दिवसांनी शुद्ध आली. तेव्हा त्यांना अंगठी व सोनसाखळी गायब असल्याचे लक्षात आले. बागल यांनी पुन्हा पुण्यात येऊन स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.