पुणे : ओबीसी आरक्षण बाबत भाजपची भूमिका दुटप्पी आहे. राज्यात ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून मोर्चा काढले गेले. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पेरिकल डेटा मात्र दिला जात नाही. तो दडवून ठेवला जात असल्याचा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित १३१ वी महात्मा फुले पुण्यतिथी व समता दिना चे औचित्य साधून समता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना समता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छगन भुजबळ यांची उपस्थिती होती.
भुजबळ म्हणाले, ओबीसी ची जनगणना झालीच पाहिजे. मात्र त्यात भाजप खोडा घालत आहे. जनगणना ही एका दिवसांत होणारी बाब नाही. त्याला बराच वेळ लागतो. त्यामुळे जनगणना सुरु असताना देखील आरक्षणचा लाभ मिळाला पाहिजे. गाई,म्हशीची जनगणना होते. तर मग ओबीसीची का नाही असा सवाल ही भुजबळ यांनी या वेळी उपस्थित केला.
आरक्षणामुळे मोठे होतात तर मग
आरक्षणामुळे अनेक जण मोठे झाले. मात्र राजकीय विषय निघाले कि त्यापासून दूर जातात. नंतर हीच मंडळी आपल्या बदलासाठी राजकीय नेत्याजवळ घुटळमळतात. तुम्ही आरक्षणामुळे मोठे झालात. मग मागच्या लोकांना कसे विसरतात. सगळीकडे महात्मा फुले, शाहू,आंबेडकर यांचे पुतळे उभा करा. कार्य्रकम करा. त्यांचा विसर पडता कामा नये असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
भिडेवाड्याचा विकास करून मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार
भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण केली जाईल. फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेची भूमीसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन या कामास तात्काळ प्रारंभ करण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी पुतळ्याचे अनावरण केले जाईल.