शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

भाजपा सदस्यांमध्येच जुंपली

By admin | Published: March 30, 2017 2:53 AM

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील एका उच्चभ्रू वसाहतीतील बंगल्याला बांधकाम परवानगी देण्याच्या विषयावरून

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील एका उच्चभ्रू वसाहतीतील बंगल्याला बांधकाम परवानगी देण्याच्या विषयावरून सर्वसाधारण सभेतच भाजपा सदस्यांमध्येच जुंपली. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. के. त्यागी, उपाध्यक्ष दिलीप गिरमकर तसेच अतुल गायकवाड, विवेक यादव, डॉ. किरण मंत्री, प्रियांका यादव, रूपाली बिडकर, अशोक पवार, विनोद मथुरावाला हे सदस्य उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांच्यासह सर्व सदस्य, प्रशासकीय अधिकारी व लष्कराचे अधिकारी सदस्य उपस्थित होते.वॉर्ड क्रमांक ७ मधील (घोरपडी गाव) १६ काहुन रस्त्यावरील स.नं. ३३१ हा बंगला पाडून त्याच्या नूतनीकरणाच्या नकाशाला मंजुरी देण्याबाबतच्या विषयाचा समावेश होता. डॉ. यादव यांनी संबंधित जागा मालकाला घरबांधणीस परवानगी द्यावी, असे सुचविले. यावर वॉर्ड क्रमांक ५चे सदस्य विवेक यादव यांनी हरकत घेतली व सर्व सदस्यांनी तेथे भेट दिल्यानंतर आगामी बैठकीत त्याला मंजुरी देण्याची सूचना केली. त्याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, यादव या मागणीवर ठाम होते. हा विषय मागे ठेवला जावा, अशी मागणी त्यांनी केली.मात्र, वॉर्ड क्रमांक ७च्या सदस्या डॉ. किरण मंत्री यांनी या बंगल्याच्या दुरुस्तीला त्वरित आणि याच बैठकीत परवानगी देण्याची मागणी केली. सर्व नियमांचे पालन केले असल्याने आराखडा मंजूर करण्याची मागणी डॉ. मंत्री यांनी केली. त्यावरून यादव आणि मंत्री यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वाद थांबविण्यासाठी गिरमकर यांनी मध्यस्थी केली. सदस्यांना प्रत्यक्ष साइट व्हिजीट करू द्या, असे सांगितले. तसेच या विषयावर नंतरदेखील चर्चा करण्यात येईल, असे सांगण्याचा प्रयत्न केला असता. मात्र, त्यांनाच पदाचे भान ठेवा, असे सल्ला देण्यात आला. त्यामुळे त्यांनी चर्चेतून अंग काढून घेतले.डॉ. मंत्री यांनी ‘माझ्या वॉर्डामधील विषयात इतर कोणीही हस्तक्षेप करू नये. या बंगल्याच्या नूतनीकरणाला लगेच परवानगी द्यावी. बोर्ड सदस्यांचा वेळ वाया घालवू नये,’ अशा सूचना करून सर्व सदस्यांनी त्वरित बंगल्याला भेट देण्याची मागणी केली. अशामुळे कॅन्टोन्मेंट कायद्याचा भंग होत असल्याचे सांगितले. यावरून त्यांच्यात आणि यादव यांच्यात खडाजंगी झाली. (प्रतिनिधी)२५ टक्के अनधिकृत बांधकामे?सध्या कॅन्टोन्मेंट क्षेत्रामध्ये २५ टक्क्यांहून अधिक अनधिकृत बांधकामे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांबाबत ठोस निर्णय घेण्याचे आदेश सर्व कॅन्टोन्मेंट प्रशासनाला दिले आहेत. मात्र, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडे कुठलीही यंत्रणा नाही. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठीचे ठोस प्रयत्नही कॅन्टोन्मेंट प्रशासन करीत नसल्याची सद्य:स्थिती आहे. अध्यक्ष ब्रिगेडियर ए. के. त्यागी यांनी बैठक संपल्यानंतर संबंधितांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वादावर पडदा पडला. मात्र, या प्रकारामुळे भाजपामधील सदस्यांमध्ये एकी नसल्याचे उघड झाले. याबाबत बैठकीनंतर प्रतिक्रिया व्यक्त देताना विवेक यादव म्हणाले, ‘‘घोरपडीमध्ये सुरू असलेल्या बांधकामांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हरकतीचे पत्र देणार आहे.’’