भव्य मिुरवणुक,जोरदार घोषणाबाजी यांनी पुण्यात भाजपा उमेदवारांनी भरले अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 02:16 PM2019-04-02T14:16:47+5:302019-04-02T14:17:54+5:30
लोकसभेची ही निवडणुक वैचारिक लढाई आहे. ही विचारांची लढाई मी लढणार आहे.
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट व बारामती मतदारसंघासाठी कांचन कुल यांनी उमेदवारी अर्ज भरले. यावेळी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बापट व कुल यांच्या समर्थनार्थ भव्य मिरवणुक काढत मला कशाची भीती, माझ्या मागे आहे महायुती..कोण आले रे कोण आले यांसारख्या जोरदार घोषणा दिल्या..
यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, विजय काळे, भीमराव तापकीर, आदी नेते उपस्थित होते.
आगामी लोकसभेत पुण्यात गिरीश बापट यांची काँग्रेसचे मोहन जोशी तर बारामती मतदार संघातून कांचन कुल यांची राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याशी लढत होत आहे. यावेळी बापट म्हणाले, मी जेव्हा लढायला उतरतो, तेव्हा मला कुठलीच लढाई अवघड नसते, आत्तापर्यंत नऊ लढाया मी जिंकलो त्यात आणि दोन लढायात फार कमी मताने मी पडलोय. लोकसभेची ही निवडणुक वैचारिक लढाई आहे. चांगला विचार, प्रगती, विकास त्याचे नाव फक्त फक्त मोदी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई आहे. लोकसभेची ही निवडणुक वैचारिक लढाई आहे. ही विचारांची लढाई मी लढणार आहे. तीन वेळा महापलिका , पाच वेळा विधानसभा लढलो आहे. गेली पंचेचाळीस वर्ष मी या शहरातील विकासाचे प्रश्न मला हाताळले आहे. मला पुण्याचे प्रश्न महापालिकेत विधानसभेत मांडता आले. . कार्यकर्तेच माझा आत्मा, ते आहेत म्हणून मी आहे. माझा कार्यकर्ता माझी ताकद आहे. युतीतल्या घटकपक्षात कार्यकर्ता हा केंद्रबिंदू आहे.भविष्यकाळात पुणेकरांची सेवा करण्यासाठी मला लोकसभेत पाठवत आहे. तसेच नि: स्वार्थ सेवा, पक्ष निष्ठा , कार्यकर्त्यांचे प्रेम यांनी मला लढण्यासाठी पे्ररणा मिळत असते आणीबाणीच्या काळात तुरुंगात पाऊल टाकताना जो निश्चयी होतो. तेवढाच निश्चयी पालिका, विधानसभेतही होतो. तोच विश्वास, तेच प्रेम, पक्ष निष्ठा, सेवार्थ भावना यांच्यासह त्याच ताकदीने यावेळेस मी लोकसभेत पाऊल ठेवत आहे. राजकीय जीवनात मी कधी कुणाला शत्रू मानत नाही. समाज , मतदार ठरवत असतो. त्याचा निर्णय सर्वसामान्य असतो. बारामतीत कुल ह्या आगामी निवडणुकीत चमत्कार घडवत एक लाख मतांनी निवडून येतील असा आत्मविश्वास वाटतो.
अर्ज भरताना दोन्ही उमेदवारांनी मतदार, कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. संजय काकडे म्हणाले, सर्वच जागांवर युती जिंकणार आहे. तसेच बारामतीत कुल एक लाख मतांनी जिंकून येतील..