काँग्रेसच्या बदनामीचे भाजपाचे षडयंत्र, पुस्तक रद्द करा : बालभारतीकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:17 AM2018-04-12T00:17:21+5:302018-04-12T00:17:21+5:30
शालेय पुस्तकांमधून काँग्रेसची बदनामी करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्षाने आखले आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केला.
पुणे : शालेय पुस्तकांमधून काँग्रेसची बदनामी करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्षाने आखले आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केला. हे पुस्तक रद्द करावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाकडे (बालभारती) करण्यात आली. यापूर्वीही राज्य सरकारने इयत्ता ७ वीच्या पुस्तकात राजीव गांधी यांची बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध केला होता. आता पुन्हा इयत्ता १० वीच्या पुस्तकात तोच प्रकार करण्यात आला आहे. चूक एकदा होऊ शकते, दोन वेळा नाही. त्यामुळे यातून त्यांचा डाव सिद्ध होतो. जनतेच्या मनातून काँग्रेसला काढून टाकता येत नाही, यासाठी शालेय पुस्तकांमधूनच काँग्रेसला बदनाम करण्याचा डाव आखला जात आहे, असे बालगुडे म्हणाले.
काँग्रेसच्या वतीने बालगुडे तसेच काका धर्मावत, अप्पासाहेब शेवाळे, नरेंद्र व्यवहारे, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे आदींनी बालभारती कार्यालयात जाऊन तिथे हे पुस्तक रद्द करा, अशी मागणी करणारे निवेदन दिले. तसा निर्णय झाला नाही तर काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.