पुणे : भाजपच्या सभा उध्दव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी हाेत आहेत. मात्र, आज उध्दव ठाकरे यांचेच नाव सशक्त आहे. शिवसेनेचे भवितव्य काय हे भाजपने ठरवायची गरज नाही. हे ठरवण्यासाठी महाराष्ट्राची जनता ठरवेल. भाजपला फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे नव्हते. त्यांना फक्त शिवसेना संपवायची हाेती त्यासाठी हे सत्तांतर केले, असा आराेप शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
नांदेडमध्ये भाजपाची सभा झाली. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमितशहा यांनी केलेल्या भाषनावर अंधारे यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय माेरे, समन्वयक निलेश जठार उपस्थित हाेते.
नामांतराच्या बाबत त्या म्हणाल्या की, संभाजीनगर व धाराशिवचे नामांतर हे उध्दव ठाकरे यांच्या काळात झाले आहेत. परंतू, गुजरातच्या अहमदाबादचे नामकरण सावरकरनगर असे भाजपा करणार आहे का? इकडे येउन काॅंग्रेसचे वल्लभभाई पटेलचे नाव सांगता. तसेचही भाजपला चाेरण्याची सवय आहे. बाळासाहेब ठाकरे, वल्लभभाई पटेल यांची चाेरी करण्याची धडपड भाजप करतायेत. त्याचवेळी त्यांच्याच शामाप्रसाद मुखर्जींचा विसर त्यांना पडत आहे.
सतरा वंदेभारत ट्रेनचा गवगवा केला. मात्र, अपघात झालेल्या ट्रेनची जबाबदारी का घेतली जात नाही., असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. यामध्ये अच्छा किया ताे माेदी ने आणि बुरा किया ताे लाेगाे ने अशी भुमिका भाजपची आहे, असेही त्या म्हणाल्या. सरस्वती हत्याकांड सारख्या महिला अत्याचार घटना का घडतात. याच घटना उद्धव यांचे सरकार असताना घडताना घडल्या असत्या तर, तुम्ही शांत बसला असता का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ज्याअर्थी निवडणुका पुढे ढकलता. राम मंदिर, ३७० कलम, ट्रीपल तलाक या मुदयांवर चर्चा केली जाते. परंतू, यामुळे देशाच्या नवजवानांना यामुळे राेजगार मिळाला आहे का. राम मंदिराच्या मुदयामुळे सामान्य लाेकांना घर मिळाले का. हिंदू - मुस्लिम विकृतीमुळे महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित करत भाजपचे राजकारण मुस्लिमद्वेशी आहे. परंतू लोक भ्रमित होणार नाहीत. जेव्हा तुमच्याकडे बाेलण्यासारखे काही नसते तेव्हा भाजप धर्माच्या आड लपण्याचा प्रयत्न करत आहे,असेही त्या म्हणाल्या.