शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पुण्याच्या जागेसाठी भाजपचा उमेदवार ठरला, काॅंग्रेसचं काय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 6:53 PM

भाजप शिवसेनेच्या युतीकडून पुण्याच्या जागेसाठी गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु अद्याप काॅंग्रेसकडून पुण्याची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे बापट यांना टक्कर देण्यासाठी काॅंग्रेस काेणाला रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे : पुण्याच्या लाेकसभेच्या जागेवर भाजपा आणि काॅंग्रेसकडून काेणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. काल रात्री जाहीर झालेल्या उमेदवारीमध्ये पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान खासदार अनिल शिराेळे यांना डावलून बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून काेण उमेदवार मिळणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असला तरी काॅंग्रेसकडून आता काेणाला रिंगणात उतरवलं जाणार याची उत्सुकता पुणेकरांमध्ये दिसून येत आहे. 

पुण्याची लाेकसभेची जागा महत्त्वाची मानली जाते. गेल्या वर्षी या जागेवरुन भाजपाचे अनिल शिराेळे हे निवडून आले हाेते. यंदा लाेकसभेसाठी पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, स्वतः अनिल शिराेळे, आमदार जगदीश मुळीक, भाजपाचे सहयाेगी खासदार संजय काकडे हे इच्छुक हाेते. या सगळ्यांमध्ये काेणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. गेल्या वेळी शिराेळे यांना गाेपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव उमेदवारी देण्यात आली हाेती. यंदा बापट यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी जाेर लावला हाेता. अखेर काल रात्री जाहीर झालेल्या यादीत बापट यांना पुण्याची युतीची उमेदवारी झाहीर झाली. 

आघाडीमध्ये पुण्याची जागा काॅंग्रेसकडे आहे. काॅंग्रेस अजून पुण्यासाठी सक्षम उमेदवाराचा शाेध घेत आहे. काॅंग्रेसकडून उमेदवारीसाठी अनेकजण उत्सुक आहेत. त्यात माजी आमदार माेहन जाेशी, पुणे महापालिकेतील काॅंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार हे काॅंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्याचबराेबर शेतकरी कामगार पक्षात गेलेले प्रवीण गायकवाड यांनी देखील काॅंग्रेस श्रेष्ठींची उमेदवारीसाठी भेट घेतली हाेती. संजय काकडे हे देखील पुण्याच्या जागेसाठी काॅंग्रेसमध्ये जाण्यास तयार हाेते. गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना टक्कर देण्यासाठी काॅंग्रेस काेणाला रिंगणात उतरवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

काॅंग्रेसच्या इच्छुकांचा दिल्ली वाऱ्या अजूनही सुरु असून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी पुण्यासाठीच्या ज्या उमेदवारांची नावे राहुल गांधींकडे पाठवली हाेती. त्यात गांधींनी अनेक बदल सुचवले हाेते. पुण्याच्या जागेसाठी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अशाेक चव्हाण,  पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम यांनी बैठक घेतली हाेती. त्यातूनही अद्याप जागेचा तिढा सुटू शकलेला नाही. त्यात गायकवाडांना राष्ट्रवादीचा पाठींबा आहे. गायकवाड हे संभाजी ब्रिगेडकडून काम करत हाेते. त्याचबराेबर शरद पवारांच्या देखील मर्जीतले मानले जातात. अनेकदा राष्ट्रवादीच्या मंचावर ते दिसून आले आहेत. त्यामुळे गायकवडांना उमेदवारी जाहीर झाल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार काॅंग्रेसच्या तिकीटावर असे चित्र निर्माण हाेईल. यापूर्वी पुण्यात काॅंग्रेसचे सुरेश कलमाडी हे खासदार हाेते. त्यांच्या इतका सक्षम उमेदवार अद्याप काॅंग्रेसला मिळू शकलेला नाही. आता युतीने उमेदवार जाहीर केल्यामुळे काॅंग्रेसला काेणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय घेणे साेपे झाले आहे. 

दरम्यान, आयात उमेदवारांना संधी न देता काॅंग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी देण्याची मागणी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. प्रवीण गायकवाड हे पुण्यातून काॅंग्रेसच्या तिकीटावरुन निवडणूक लढविण्यासाठी आग्रही असून त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPuneपुणेElectionनिवडणूक