अखेर पुणे जिल्हा बँकेत भाजपने केला चंचूप्रवेश; उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 08:27 AM2022-01-05T08:27:53+5:302022-01-05T08:28:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत २१ पैकी १९ जागा जिंकत राष्ट्रवादी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत २१ पैकी १९ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनलने अपेक्षित वर्चस्व कायम राखले. सहा आमदारांची बिनविरोध निवड झाली होती, तर पहिल्यांदाच दोन जागांवर विजय मिळवत भाजपने जिल्हा बँकेत प्रवेश केला.
निवडणुकीत २१ पैकी १४ संचालक बिनविरोध निवडून आले होते. शिल्लक सात जागांसाठी मतदान घेण्यात आले. भाजपने स्वतंत्र पॅनेल उभे केले होते.
‘क’ वर्ग गटात भाजपचे प्रदीप कंद विजयी झाले. त्यांना ४०५, तर राष्ट्रवादीचे विद्यमान संचालक सुरेश घुले यांना ३९१ मते मिळाली. भाजपचे आप्पासाहेब जगदाळे, (इंदापूर) बिनविरोध निवडून आले आहेत.
मुळशी तालुक्यातील विद्यमान संचालक आत्माराम कलाटे, हवेली तालुक्यातील ज्येष्ठ संचालक प्रकाश म्हस्के आणि तज्ज्ञ संचालक सुरेश घुले पराभूत झाले.
सात आमदार, तीन मंत्री
अजित पवार, दिलीप वळसे, अशोक पवार, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, संग्राम थोपटे, संजय जगताप असे सात आमदार बँकेचे संचालक झाले. यातले पवार, वळसे-पाटील आणि भरणे राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे सात आमदार व तीन मंत्री संचालक असणारी ही राज्यातली एकमेव ‘हेविवेट’ बँक आहे.