शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

इंदापूर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींवर भाजापचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:12 AM

इंदापूर : इंदापूर तालुक्यात ३८ ग्रामपंचायतींवर भाजपची निर्विवादपणे सत्ता आली आहे, तर ४ ग्रामपंचायती संमिश्र आहेत. भिगवण, वालचंदनगर आदी ...

इंदापूर : इंदापूर तालुक्यात ३८ ग्रामपंचायतींवर भाजपची निर्विवादपणे सत्ता आली आहे, तर ४ ग्रामपंचायती संमिश्र आहेत. भिगवण, वालचंदनगर आदी प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपने एकतर्फी सत्ता मिळवली आहे. या निवडणूक निकालातून इंदापूर तालुक्यावरील भाजपचे वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध झाले आहे असा दावा माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

इंदापूर तालुक्यातील जनता भाजपच्या पाठीमागे असल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे. इंदापूरच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेने मतपेटीतून दिलेला हा स्पष्ट कौल असल्याचेही भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. भाजपच्या ताब्यात तालुक्यातील सुमारे सत्तर टक्के ग्रामपंचायती आल्या आहेत. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी कारखान्याच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे आदींसह भाजपचे सर्व पदाधिकारी, गावोगावच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयासाठी परिश्रम घेतल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

आगामी काळातील सर्वच निवडणुका जिंकून भाजप आपली ताकद दाखवून देईल, असा विश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपने दावा केलेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे : नीरा नरसिंहपूर, गोंदी, ओझरे, पिठेवाडी, भोडणी, भांडगाव, कचरवाडी ( बा.), टणू, सरडेवाडी, बाभुळगाव, गलांडवाडी नं.१, गलांडवाडी नं.२, वरकुटे खुर्द, जाधववाडी, रेडा, सराफवाडी, पिटकेश्वर, निमसाखर, भिगवण, तक्रारवाडी, पोंधवडी, शेटफळगढे, अकोले, निरगुडे, निंबोडी, पिंपळे, व्याहळी, गोतोंडी, दगडवाडी, निरवांगी, तावशी, भादलवाडी, वालचंदनगर, कळंब, सपकळवाडी, लोणी देवकर, बळपुडी, भावडी, चांडगाव या ३८ ग्रामपंचायती भाजपकडे आल्या असल्याचा दावा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाने केला आहे.

दरम्यान,या विजयी उमेदवारांचे हर्षवर्धन पाटील यांचेसह आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, राजवर्धन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार आदींनी अभिनंदन केले असल्याचेही प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.