वालचंदनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात कळंब आणि वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीमुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जिल्हा परिषद गटात भाजपने दोन ग्रामपंचायतीवर बाजी मारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा तर लागली नाही ना, असा सवाल ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
कळंब ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग एकमधून भाजपच्या कुसूम सर्जेराव कोळी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश आप्पासाहेब डोंबाळे, शितल सागर कोळी यांनी विजय मिळविला. प्रभाग क्रमांक दोनमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कल्याण डोंबाळे तर भाजपचे अर्चना पोपट चव्हाण व भामा दादा भालेराव, हे निवडून आले आहेत. प्रभाग तीनमधून सारिका ज्ञानदेव मेटकरी व विद्या अतुल सावंत हे दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे रामचंद्र शिवराम कदम, तर भाजपचे, परविन इकबाल शेख व डॉ.अनिता नंदकुमार सोनवणे, निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपचे प्रमोद विश्वावसराव पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे, संदीप मधुकर पाटील, सोनाली प्रमोद खंडागळे,निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपचे अश्विनी अभिजीत नलवडे, लक्ष्मण जगन्नाथ पालवे, सुनील बाबू मोरे हे निवडून आले असल्याने, कळंब ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ तर भाजपच्या ९ जागा निवडून आल्या असल्याने, कळंब ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत बसपाचे हर्षवर्धन अर्जुन गायकवाड तर भाजपचे, संदीप गुणवंत पांढरे, राष्ट्रवादी
काँग्रेसच्या वैशाली पोपट मिसाळ, प्रभाग २ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण किसनराव वीर, भाजपचे मनिषा सत्यशिल पाटील, स्वाती सचिन अचलारे निवडून आले आहेत. प्रभाग ३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबादास भानुदास शेळके, प्राजक्ता विनोद कांबळे, निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपचे संजय सुरेश नकाते, रोहित जगन्नाथ झेंडे व अनिता संतोष गायकवाड निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपचे संतोष नामदेव गायकवाड, पद्मावती जनार्दन परीट, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वैशाली शरद शिवशरण निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपच्या आरती दयानंद झेंडे निवडून आल्या आहेत, तर भाजपच्या शरद श्रीहरी गायकवाड व महादेवी रायप्पाकोळी हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपने निवडणुकीत वर्चस्व मिळविले आहे.