दौंड तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या युरिया खतांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी हेलपाटे मारून देखील युरिया मिळत नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाच्या नियोजनाअभावी ऐन खरीप हंगामात युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तरी युरिया तसेच उपलब्ध नसलेल्या खतांचा तुटवडा दूर करून पुरवठा सुरळीत व्हावा, तसेच युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी आपणाकडून संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव आटोळे, महिला तालुकाध्यक्षा कल्पना रांधवण, भीमा-पाटसचे माजी संचालक लक्ष्मण रांधवण, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय काळभोर, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष अभिमन्यू गिरमकर, कानिफनाथ सूर्यवंशी, सुशील सांगळे, शरद आटोळे, निखिल आटोळे आदी उपस्थित होते.