पुणे: भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (harshwardhan patil tested corona positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी स्वत: समाज माध्यमाद्वारे दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे.
दोन दिवसांपूर्वीच पाटील यांच्या कन्या अंकिता यांचा निहार ठाकरे यांच्याशी मुंबई येथे विवाह झाला होता. या विवाह समारंभास राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हर्षवर्धन पाटील यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आॅमायक्रोनच्या प्रादुर्भावानंतर कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे.