पुणे : पालिकेच्या महिला बाल-कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, विधी समिती आणि क्रीडा समितीच्या सदस्यांची निवड मंगळवारी जाहीर करण्यात आली. पालिकेच्या मुख्य सभेमध्ये ही निवड पक्षीय बलाबलानुसार करण्यात आली. या समित्यांवर अपेक्षेप्रमाणे भाजपाचे वर्चस्व दिसून आले.
गेल्या वर्षी कोरोनामुळे सप्टेंबरमध्ये निवड झालेल्या सदस्यांची मुदत 31 मार्च रोजी संपत आहे. सत्ताधारी भाजपाकडे असलेल्या या समित्यांमध्ये प्रत्येकी 13 सदस्य असून त्यातील आठ सदस्य भाजपाचे उर्वरीत सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना तसेच कॉंग्रेसचे आहेत. या समित्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदही भाजपाकडेच आहे. पालिकेच्या सोमवारी झालेल्या मुख्यसभेत महापौरांनी नावाची घोषणा केली.
विधी समितीच्या सदस्यपदी बापूराव कर्णे, आदित्य माळवे, किरण दगडे पाटील, सम्राट थोरात, संदीप जऱ्हाड, दिशा माने, अनिता कदम, जयंत भावे, आनंद अलकुंटे, युवराज बेलदरे, सायली वांजळे, विशाल धनवडे, अजित दरेकर यांची निवड करण्यात आली. तर, क्रीडा समिती सदस्यपदी अजय खेडेकर, प्रवीण चोरबेले, नीता दांगट, ज्योती कळमकर, एड. गायत्री खडके, राणी भोसले, योगेश समेळ, अॅड. भैय्यासाहेब जाधव, हाजी गफूर पठाण, दिलीप वेडे पाटील, अॅड. अविनाश साळवे, रफिक शेख, रत्नप्रभा जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासोबतच महिला बालकल्याण समितीमध्ये रुपाली धाडवे, राजश्री शिळीमकर, शीतल शिंदे, अर्चना मुसळे, सुलोचना कोंढरे, अश्विनी पोकळे, विजयालक्ष्मी हरिहर, वैशाली बनकर, अश्विनी कदम, लक्ष्मी दुधाने, वैशाली मराठे, श्वेता चव्हाण, ऐश्वर्या जाधव यांना स्थान देण्यात आले आहे.
तसेच, शहर सुधारणा समितीमध्ये आनंद रिठे, श्वेता गलांडे-खोसे, वृषाली कामठे, उमेश गायकवाड, वासंती जाधव, स्वाती लोखंडे, मनीषा लडकत, राजश्री नवले, वनराज आंदेकर,दत्तात्रय धनकवडे, संगीता ठोसर, सुजाता शेट्टी, पूजा कोद्रे यांची निवड करण्यात आली आहे.
जैव विविधता समितीचा किरण दगडे-पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर नगरसेवक संजय घुले यांची नियुक्ती करण्यात आली.