भाजपकडून सत्तेचा एजन्सीचा गैरवापर केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुण्यामध्ये कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
पुण्यामध्ये आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या बैठकीनंतर अनिल देशमुखांचा घरावरील छापा प्रकरणावरून त्यांनी भाजपवर टीका केली.
सुळे म्हणाल्या, "राजकारण हे विचारांचं असतं आणि लोकांच्या सेवेसाठी असतं.आजपर्यंत या देशात एजन्सीचा वापर आपल्या विरोधकांसाठी झालेला पाहिला नाही,ऐकलेला नाही.एजन्सीचा गैरवापर ही त्यांची स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे. भाजपची सत्ता आल्यापासून पवार साहेबांना पण नोटीस आली होती,अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. महाराष्ट्रात अस राजकारण कधी होत नाही,महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर कधीही विरोधकाना त्रास देण्याकरता केला नाही. ही नवीन एसओपी ज्याला म्हणता ती स्टाईल काढलेली आहे. हे जाणून बुजून केलं जातं आहे हे दिसते आहे"
सुळे म्हणाल्या "महाविकास आघाडी विकासाचे राजकारण करत आहे.आम्ही कोरोना तिसऱ्या लाटेसाठी काम करत आहोत. वैयक्तिक आम्ही कधी राजकारण आम्ही कधी करत नाही करणाऱ नाही"