धनकवडी : राज्यभर धुलीवंदनाचा उत्साह बघायला मिळतोय. प्रत्येकजण आज रंगांची उधळण करत धुलीवंदनाचा आनंद साजरा करतोय. अशातच आमदार भिमराव तापकीर आणि माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील होळी खेळण्याचा मोह आवरला नाही. आज मॉर्निंग वॉकला जाताना पुण्यातील तळजाई टेकडीवर होळी खेळण्याचा आनंद लुटला.
शहरासह उपनगरात धुलीवंदनानिमित्ताने चांगलाच जल्लोष पाहायला मिळत आहे. पुण्यात धुलीवंदनाला सुरुवात झाली असताना पुण्यातील तळजाई टेकडी वर मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या माजी मंत्री आणि आमदार दत्ता भरणे यांना त्यांच्या मित्रांनी रंगवलं आहे.
दत्ता भरणे हे राष्ट्रवादीचे नेते असून ते ठाकरे सरकारच्या काळात मंत्री होते. तर आमदार भिमराव तापकीर खडकवासला मतदारसंघातून तीन वेळा भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते आज सकाळी मॉर्निंक वॉकला गेले असताना मित्रांसोबत होळी खेळण्याचा आनंद घेतला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.