पुणे: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांचा या महिन्यात दौरा नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बारामती लोकसभा क्षेत्राचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवारी संपूर्ण एक दिवस ते बारामती लोकसभा क्षेत्रात विविध कार्यक्रम व बैठकांतून संवाद साधून भाजपा संघटनात्मक बाबींवर कार्यकर्त्यांशी चर्चा करतील.
सोमवारी रात्री 11.30 वा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती येथे पोहचतील व मुक्कामी असतील. मंगळवारी सकाळी 08.30 वा. कन्हेरी मंदिरला भेट देतील. सकाळी 09.15 वा. काटेवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांशी बैठकीतून संवाद साधतील. सकाळी 10.00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा-अहिल्यादेवी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रैलीत सहभागी होतील. सकाळी 11.00 वा. कसबा येथील युवा वॉरिअर्स शाखेचे उद्घाटन करतील.
सकाळी 11.20 वा. भाजपा कार्यालयास भेट देतील. दुपारी 12.30 वा. मुक्ताई लॉन भिवगन रोड येथे भाजपा जिल्हा बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. दुपारी 01.30 ते 02.00 राखीव. दुपारी 02.30 वा. मुक्ताई लॉन येथेच लोकसभा कोअर टीमची व दुपारी 03.30 वा. सोशल मीडिया बैठक घेतील. सायंकाळी 05.30 वा. माळेगाव येथे बुथ बैठक घेतील. सायंकाळी 06.30 वा. मारेगाव गणपती मंदिरात दर्शन घेतील. सायंकाळी 07.00 वा. पुणेकडे प्रस्थान करतील. रात्री 08.00 वा. सरतोपवाडी येथील गणेश फेस्टीवलला भेट देतील.