पुणे : भाजपचे पुणे शहरातील पदाधिकारी विनायक आंबेकर यांनी फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांवर आंबेकर यांनी पोस्ट केली होती. या वादग्रस्त पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून आंबेकर यांना मारहाण करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अवमानकारक पोस्ट केल्याने ही मारहाण करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर आंबेकर यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आंबेकर यांना मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आप्पा जाधव, गणेश नलावडे, रोहन पायगुडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली होती. विनायक आंबेकर यांच्या विरोधात दोन दिवसआधीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अवमानकारक पोस्ट केल्याने ही मारहाण करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवारांवर फेसबूकवर पोस्ट केली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे अनेक ठिकाणी तेढ निर्माण होताना दिसत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर भाजपने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
तक्रारीत काय म्हटले?
विनायक आंबेकर यांनी मारहाणीनंतर पोलीस ठाण्यात टाकणार दिली होती. राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयात आले. त्यांनी आंबेकर यांना जाब विचारत त्यांना मारहाण केली, त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर व्हायरल झाला होता, असे आंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या या तक्रारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर काय म्हणाले विनायक आंबेकर-
मारहाणीत राष्ट्रवादी नेते अंकुश काकडेंचा हात असल्याचा आरोप विनायक आंबेकर यांनी केला आहे. मारहाणीची तक्रार मी पोलिसांत दिली असल्याचे आंबेकर यांनी सांगितले होते.