शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

भाजपा पदाधिकाऱ्याच्या स्विय सहायकाला मारहाण

By admin | Published: February 22, 2015 12:31 AM

भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या स्विय सहायकाला नगरसेविकेच्या पतीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी पत्नीची वर्णी लागली नाही म्हणून भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या स्विय सहायकाला नगरसेविकेच्या पतीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने पक्षातील गटबाजी पुन्हा उफाळून समोर आली असून, त्याचेच पडसाद या घटनेत उमटले असल्याचे भाजपाच्या वर्तुळात बोलले जात आहे. पालिकेच्या स्थायी समितीमधून या वेळी भाजपाचे हेमंत रासणे, योगेश मुळीक तसेच मोनिका मोहोळ हे तीन सदस्य निवृत्त झाले आहे. त्यांच्या जागी पक्षाकडून राजेंद्र शिळीमकर, मुक्ता टिळक आणि श्रीकांत जगताप यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या सदस्यांची निवड पक्षाने सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून केली आहे. या सदस्यांत आपल्या पत्नीची वर्णी लागावी यासाठी एका नगरसेविकेच्या पतीने पदाधिकाऱ्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र, संधी मिळाली नाही. गुरुवारी याबाबत विचारणा करण्यासाठी नगरसेविकेचा पती गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या डेक्कन परिसरातील कार्यालयात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी बोलण्याचे आश्वासन देत या पदाधिकाऱ्याने नगरसेविकेच्या पतीशी बोलणे टाळले.हे पदाधिकारी गेल्यावर त्यांचा स्विय सहायक कार्यालयाबाहेर आला. त्या वेळी नगरसेविकेचा पतीही कार्यालयाबाहेर आला व त्याने स्विय सहायकाला मारहाण केली. मारहाण करून राग शांत झाल्यावर संबंधित पतीराज निघून गेले. ही घटना पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजताच शुक्रवारी सकाळी त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्याचे कार्यालय गाठले. हा प्रकार योग्य नसल्याने त्यांनी या घटनेची तक्रार प्रदेश स्तरावरील नेत्यांकडे करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)