लॉकडाऊनविरोधात बुधवारी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी तहसीलदार अनिल ठोंबरे यांना निवेदन दिले. तत्पूर्वी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत पांडुरंग शिंदे बोलत होते.
पांडुरंग शिंदे म्हणाले की, इंदापूर तालुका व इंदापूर शहरातील सर्व व्यापारी वर्ग, शेतकरी, फळबाजी विक्रेते, कामगार वर्ग या निर्णयामुळे यांचेवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. मागील एक वर्षापासून सदर लोकांना जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे आत्महत्याचे प्रमाण वाढलेले आहे. वातानुकूलित कार्यालयात बसून जे मंत्रिमंडळ निर्णय घेत आहेत, त्यांना गोरगरीब, शेतमजुरांची, कामगारांची, व्यापारी वर्गाची असणारी वेदना व दु:ख होणारी उपासमार याची काहीएक देणे घेणे नाही.
महाविकास आघाडी सरकार हे नैसर्गिक सरकार नसून अनैसर्गिक विचारावर स्थापन झालेले असून लोकसेवा व लोकजीवन हे ते पूर्णपणे विसरलेले आहेत. लोकसेवेऐवजी शासकीय यंत्रणा हाताशी धरून ते मेवा गोळा करण्याचे काम करीत आहेत. सर्व सामान्य कष्टकरी हा अधिक भरडला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने केलेला लॉकडाऊनचा हा तुघलकी निर्णय त्वरित मागे घ्यावे. अन्यथा हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी लोकांना घेवून रस्त्यावर उतरु, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
०७ इंदापूर
इंदापूर तहसीलदारांना निवेदन देताना भाजप कार्यकर्ते.