पुणे : पुणे महापालिकेने गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेले आरोग्यप्रमुख पद अद्यापही न भरल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसने महापौर मुक्ता टिळक यांनाच घेराव घातला. जर शहराला आरोग्य प्रमुख देत नसाल तर आम्हीही महापौरांना सोडणार नाही असा पवित्रा यावेळी घेण्यात आला. शहरात सध्या साथीचे आजार वाढलेत,पावसाळ्यापुर्वीचे कोणतेच नियोजन नाही असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. येरवड्यातील स्व.राजीव गांधी रूग्णालयात महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळेच गर्भवती महिलेला बाळासह जीव गमावण्याची घडल्याचा उच्चार यावेळी करण्यात आला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आतापर्यंत तीन निवेदन दिले,खुप वेळा मागण्या केल्या,पण महापौरांनी ज्या पद्धतीने आज उत्तरं दिली त्यावरून एक गोष्ट नक्कीच समजली ती म्हणजे नियोजनशुन्य कारभाराचे हे धनी आहेत. आठ दिवसांनी याच ठिकाणी याच वेळी यापेक्षा मोठ्या संख्येने उपस्थित राहुन जाब विचारू,आता हेच सांगुन राष्ट्रवादी महिला काॅग्रेस महापौराच्या दालनातुन बाहेर पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.