पुणे : अयोध्येतील राम मंदिर ठरलेल्या जागीच होणार असून तिथे मंदिर बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याच्या विधानाचा पुनरूच्चार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात केला. या विषयवार शरद पवार आणि काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी असे आव्हानही त्यांनी दिले. शहरात भरवण्यात आलेल्या शक्ती केंद्र प्रमुखांच्या संमलेनात त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हाध्यक्ष आ. बाळासाहेब भेगडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर टीका केली.पुढे ते म्हणाले की,कॉग्रेसचा ओआरओपी (वन रँक वन पेन्शन) केवळ वन राहुल और वन प्रियंका आहे. आजपर्यंत मौनीबाबाचे भारतात सरकार आहे म्हणून अतिरेकी देशात घुसले. मात्र मोदींनी सर्जीकल स्ट्राईक करून सडेतोड उत्तर दिले. आणि देशात मौनीबाबाचे सरकार नाही हे दाखवून दिले. चाळीस लाख घुसखोरांना मोदी सरकारने शोधून पळवून लावले. विरोधकांना रडत बसु द्या, मला महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४५ जागा जिंकून द्या, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे सर्व घुसखोर शोधून शोधून ठेचून काढू.
पुढे ते म्हणाले की, भाजपची ओळख कार्यकर्ता आहे. अनेक गोष्टींच्या बाबतीत भाजप इतर पक्षांपेक्षा खूप वेगळी आहे. ही पार्टी नेत्यांची नाही तर कार्यकर्त्यांची आहे. अनेक लढाया आम्ही केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकल्या आहेत.
- आगामी लोकसभेची निवडणुक देशाची भविष्यातूल वाटचाल दर्शवणारी आहे. जातीवाद, परिवारवाद याला नाकारून विकास करणाऱ्या नेतृत्वाला पुढे नेणारी ठरणार आहे.
- काँग्रेस सरकारने १० वर्षात ५३ हजार कोटी कर्ज माप केले होते. भाजपने ५ वर्षात ७५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. राहुल गांधी यांना तर बटाटा जमीनीच्या वर येतो की जमिनीमध्ये येतो, हे सुद्धा माहीत नाही.