शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
4
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
5
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
6
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
7
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
8
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
9
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
10
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
11
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
12
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
13
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
14
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
15
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
16
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
17
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
18
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
19
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
20
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!

Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमध्ये भाजपची मतं सुरक्षित; तिरंगी लढतीत मतांची विभागणी होणार, फटका कोणाला बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2024 4:56 PM

कोथरूड मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून भाजपच्या मतांना अजिबात धक्का लागलेला नाही

पुणे : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. २०१४ पासून प्रचंड मताधिक्याने भाजप कोथरुडमध्ये निवडून येत आहे. मागील निवडणुकांच्या मतांचे गणित पाहता भाजपची मतं आतापर्यंत सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. मात्र आगामी विधानसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याने मतांच्या विभागणीचा फटका कोणाला बसणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. महायुतीकडून चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीकडून चंद्रकांत मोकाटे आणि मनसेकडून किशोर नाना शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

कोथरूड हा विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. यापूर्वी हा मतदारसंघ शिवाजीनगरचा भाग होता. भाजपने कसब्याप्रमाणेच या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले असले तरी येथे पहिली मोहोर शिवसेनेने उमटविली. पुनर्रचनेनंतर पहिल्याच निवडणुकीत चंद्रकांत मोकाटे निवडून आले. त्याही आधी शशिकांत सुतार यांनी हा शिवसेनेचा बालेकिल्ला केलाच होता, पण नंतरच्या काळात कसबा, सदाशिवपेठ, नारायणपेठ इथले रहिवासी वाढू लागले आणि राजकीय वारेही बदलले.

कोथरूड मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या पहिल्याच २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांनी ५२ हजार ०५५ मते घेऊन मनसे उमेदवार ॲड. किशोर शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांना ४४ हजार ८४३ मते मिळाली होती. मोकाटे यांनी ७ हजार २१२ मतांची आघाडी घेतली होती. सन २०१४ लोकसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आपली आघाडी मोडत निवडणूक वेगवेगळी लढवण्याचे ठरवले. भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची २५ वर्षे सुरू असलेली युतीदेखील संपुष्टात आली. यामुळे महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत झाली होती. कोथरूडमधून भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी १ लाख ९४१ मते घेऊन शिवसेनेच्या मोकाटे यांचा पराभव केला. मोकाटे यांना ३६ हजार २७९ मते पडली. कुळकर्णी ६४ हजार ६६२ मतांची लीड घेऊन विजयी झाल्या. कोथरूडमधील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे मताधिक्य आहे.

सन २०१९ मध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी झाले. त्यांना १ लाख ५ हजार २४६ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना ७९ हजार ७५१ मिळाली. त्यांचा २५ हजार ४९५ मतांनी पराभव झाला. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना ५३.९३ टक्के मते मिळाली, तर शिंदे यांना ४०.८७ टक्के मते मिळाली.

कोथरूड मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून भाजपच्या मतांना अजिबात धक्का लागलेला नाही. मागील निवडणुकीत तर मनसेला इतर पक्षांनी पाठिंबा देऊनही शिंदेंचा २५ हजारांनी पराभव झाला होता. आता तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे दोन्ही पक्षांना कोथरूडमध्ये मताधिक्य असल्याचे दिसून आले आहे. मात्र ते भाजपच्या मतांसमोर कमीच असल्याचे दिसते आहे. भाजप हे दोघांसमोरील आव्हान आहे. मतांचं गणित बदलण्यासाठी अथवा निवडून येण्यासाठी जोर लावावा लागेल असं सध्या तरी दिसते आहे.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kothrud-acकोथरुडchandrahar patilचंद्रहार पाटीलMahayutiमहायुतीMNSमनसेShiv Senaशिवसेना