पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्याबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील सभेत त्यांनी भोंगे उतरवण्याबाबत ३ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. आता मात्र ईदच्या मध्ये काही अडचण येऊ नये. म्हणून ४ तारखेपर्यंत भोंगे उतरले पाहिजेत असा इशारा राज यांनी दिला. त्यानंतर जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मनसैनिकांना केले आहे. त्यांचे त्याचबरोबर नुसते मशिदीवरील नाही.
तर सर्वच प्रार्थनास्थळांवरील भोंगे उतरायला हवेत असेही त्यांनी औरंगाबादच्या सभेत सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी. असे प्रार्थना स्थळांना पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरावरील भोंगे कालपासून बंद होऊ लागले आहेत. त्यावरच खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपवर टीका केली आहे. भाजपने राज ठाकरेंच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोठला त्यामुळं हिंदू समाज राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राऊत म्हणाले, मनसे पक्ष गोंधळलेल्या स्थितीत आहे. राज ठाकरे यांची भूमिका हिंदुत्वाच्या विरोधात आहे. काल मशिदीवरील भोंगा प्रकरणामुळे पंढरपूर, शिर्डी आशा अनेक ठिकाणी काकड आरत्या होऊ शकल्या नाहीत. अनेकजण त्याचा आनंद घेत असतात. परंतु काकड आरतीचा आवाज ऐकू न आल्याने भाविकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
भाजपने राज ठाकरेच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला
राज ठाकरे यांनी मशिदीबरोबरच सर्व प्रार्थनास्थळांवरचे भोंगे उतरले पाहिजेत असे सांगितले होते. त्यामुळे काल काकड आरतीच्या वेळी मंदिरांवरीलही भोंगे बंद होते. त्यावर राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, भाजपने राज ठाकरेच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला. त्यामुळं हिंदू समाज राज ठाकरे यांच्यावर नाराज आहे.