भाजप हिंदू धर्माचे नाव घेते पण सरकार मात्र अधर्माने चालवते; गोपाळ तिवारींचा आरोप
By राजू इनामदार | Published: April 28, 2023 05:59 PM2023-04-28T17:59:13+5:302023-04-28T21:22:01+5:30
सत्य, न्याय, निती ही हिंदू धर्माची मुलभूत मुल्य आहेत, हिंदुत्वाचे नाव घेत भाजप ही मुल्यच पायदळी तुडवत आहेत
पुणे: काँग्रेसच्या वॉरंटी गँरंटीबद्दल बोलणारे पंतप्रधान फक्त २ वेळा झालेत, काँग्रेस १०वेळा निवडून आली आहे, काँग्रेसची लाईफ टाईम गँरंटी आहे असे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांंनी केली. राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने लोकशाहीचे भाजपकडून होत असणारे अवमुल्यन यावर पत्रकार परिषद घेण्यात आली.
त्यात बोलताना तिवारी यांनी भारतीय जनता पक्ष हिंदू धर्माचे नाव घेत आहे, पण सरकार मात्र अधर्माने चालवत आहे असा आरोप केला. संसदेत प्रवेश करताना पायऱ्यांवर डोके ठेवणारे पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष संसदेत मात्र लोकशाहीतील कोणतेही संकेत पाळत नाहीत. सत्य,न्याय, निती ही हिंदू धर्माची मुलभूत मुल्य आहेत, हिंदुत्वाचे नाव घेत भाजप ही मुल्यच पायदळी तुडवत आहेत असे ते म्हणाले. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत भाजपवर आरोप केले आहेत. त्याचा खुलासा करण्याची जबाबदारी घ्यायला ते तयार नाहीत हिंदू धर्माचे नाव घेत सत्तेवर आले पण त्यांचा हिंदू धर्म सत्तेपूरताच आहे. देशातील जवानांचे बळी जात असताना हे करत तरी काय होते. त्यांचेच राज्पाल असलेल्या सत्यपाल मलिक यांच्या एकाही आऱोपाला उत्तर द्यायचे धाडस त्यांच्यात नाही काँग्रेसने नूकसान सोसूनही लोकशाही मुल्य जपली, वाढवली. पण भाजपला ते जमत नाही. त्यांना देशातील लोकशाही संपवायची आहे असे तिवारी म्हणाले.
राजीव गांधी स्मारक समिती या सर्व गोष्टी घेऊन जनतेसमोर जाणार आहे. युक्रांद ,काँग्रेस वकिल सेल हे बरोबर आहेत. आम्ही लवकरच स्वाक्षरी मोहिम सुरू करत आहोत. जनतेमध्ये या विषयावर जाग्रुती करणार आहोत असे यावेळी सांगण्यात आले.