पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा पुणे लोकसभा मतदारसंघातील एक प्रमुख मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. २००८ च्या पुनर्रचनेनुसार या मतदारसंघातून अनेक महत्त्वाचे परिसर कोथरुडला जोडले गेले, तर काही नवी गावे जोडली गेली.
या मतदारसंघात एकूण २ लाख ९१ हजार ००६ मतदारांपैकी १ लाख ४४ हजार ३२५ मतदार महिला आहेत. शिवाय मतदान करण्यात महिलांचा हिरिरीने सहभाग आहे. त्यामुळे महिलांची मते निर्णायक ठरणार आहेत. समाजातील संमिश्र वस्ती व मध्यमवर्गीयांची लोकसंख्या येथे मोठ्या प्रमाणावर आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी पाच हजार १२४ मतांचे लीड घेत काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांच्यावर विजय मिळविला होता. शिरोळे यांना ५८ हजार ७२७ मते मिळाली होती, तर बहिरट यांना ५३ हजार ६०३ मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीच्या अनिल कुऱ्हाडे यांनी १० हजार ४५४ मते घेतली होती.
३ निवडणुकीची निकाल व मिळालेली मते
२०१९ निकाल - भाजप - सिद्धार्थ शिरोळे - ५८,७२७ ( विजयी ५१२४). काँगेस आय - दत्ता बहिरट - ५३६०३. वंचित बहुजन आघाडी - अनिल कुऱ्हाडे - १०४५४.
२०१४ निकाल - भाजप - विजय काळे - ५६४६० (विजयी २२०४७). काँगेस आय - विनायक निम्हण - ३४४१३. राष्ट्रवादी काँगेस - अनिल भोसले - २४१७३.
२००९ निकाल - काँगेस आय - विनायक निम्हण - ५०९१८ (विजयी २०५३०). भाजप - विकास मठकरी - ३०३८८. मनसे - रणजित शिरोळे - २६१४३.