शिवजयंती साजरी करण्यासाठी राज्य शासनाने नियम व अटींत साजरी करावी, असे निर्बंध घालण्यात आले आहे. या निर्णयाचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मग शिवजयंती साजरी करण्यासाठी निर्बंध का? असा प्रश्न करत शिवजयंती साजरी करण्याची मागणी युवा मोर्चाच्या वतीने महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष काळुराम पिंजण, युवा मोर्चा जिल्हा संपर्कप्रमुख संदेश जाधव, श्याम पुसदकर, मयुर होले,सरचिटणीस शुभम थोरात, सिद्धेश सांडभोर, वैभव मलघे, दिपक जाधव, आकाश जोशी, सुजित काशिद,आनंद वडगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
१४ चाकण निवेदन
भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने निवेदन देताना.