सासवड : छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारकडून अनेक अडचणी लादण्यात आल्या आहेत. मिरवणूक, पोवाडे, बाईक रॅली यावर अनेक प्रकारचे निर्बंध राज्य सरकारने घातलेले आहेत. ते निर्बंध उठवण्यासाठी रविवारी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने राज्य सरकार विरोधात आंदोलन केले.
सासवड (ता. पुरंदर) येथे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्याकडे युवा मोर्चाचे वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस गुप्तविभागाचे लियाकतअली मुजावर उपस्थित होते.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील, सरचिटणीस अॅड. श्रीकांत ताम्हाणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. तर पुरंदर तालुका सरचिटणीस श्रीकांत थिटे, सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, आनंद जगताप, हनुमंत साळुंखे, अमोल जगताप, संकेत मोरे, हृषीकेश धसाडे, नीलेश धुमाळ, सुरज भिरे, महेश भाडळे, सचिन हांडे, संदीप कटके, अक्षय शेवते, तुषार कुदळे, विजय जगताप, उमेश पवार, सागर मर्डीकर, अक्षय निंबाळकर आदी उपस्थित होते.
फोटो : सासवड (ता. पुरंदर) येथे राहुल घुगे यांना निवेदन देत असताना भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते.