शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

भाजपासमोर मनसेचे आव्हान

By admin | Published: November 07, 2016 1:40 AM

कसबा मतदारसंघातील भाजपाचा परंपरागत बालेकिल्ला असलेला बहुतांश भाग प्रभाग क्रमांक १५ मध्ये समाविष्ट झाला आहे.

पुणे : कसबा मतदारसंघातील भाजपाचा परंपरागत बालेकिल्ला असलेला बहुतांश भाग प्रभाग क्रमांक १५ मध्ये समाविष्ट झाला आहे. या बालेकिल्ल्यात मागील वेळेस अनपेक्षितपणे बाजी मारलेल्या मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे यांचेच यंदाही भाजपासमोर आव्हान असणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकच जागा असल्याने भाजपाचे विद्यमान नगरसेवक दिलीप काळोखे व अशोक येनपुरे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. ऐतिहासिक शनिवार वाडा, महात्मा फुले मंडई, राजा दिनकर केळकर संग्रहालय अशा वैभवशाली वास्तूंचा समावेश प्रभाग क्रमांक १५ मध्ये झालेला आहे. त्याचबरोबर अहिल्यादेवी हायस्कूल मुलींची शाळा, हुजूरपागा, न्यू इंग्लिश स्कूल अशा प्रसिद्ध शाळादेखील याच प्रभागात येतात.भाजपाचे दिलीप काळोखे, मुक्ता टिळक, हेमंत रासने व मनसेच्या रूपाली पाटील-ठोंबरे या प्रभागातील विद्यमान नगरसेवक आहेत. त्याचबरोबर भाजपाचे नगरसेवक अशोक येनपुरे व प्रतिभा ढमाले यांचाही काही भाग या प्रभागत आला आहे. भाजपाचा मतदार या प्रभागात मोठा असल्याने सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपाचे विद्यमान नगरसेवक काळोखे व येनपुरे यांच्यामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. दाटीवाटीने उभे असलेले वाडे, सोसायट्या या प्रभागात मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे पार्किंगचा प्रश्न प्रभागात मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर प्रभागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न प्रभागात प्रामुख्याने आहेत. काँग्रेसकडून ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी या प्रभागातून निवडणूक लढवावी, असा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडूनही संघटनात्मक कामाच्या जोरावर जोरदार प्रयत्न केले जात आहेत. भाजपाकडून अशोक येनपुरे, दिलीप काळोखे, मुक्ता टिळक, हेमंत रासने, प्रमोद कोंढरे, राजेश येनपुरे, प्रतिभा ढमाले, रागिणी खडके, रत्नदीप खडके, नितीन गुजराथी इच्छुक आहेत.मनसेकडून रूपाली पाटील-ठोंबरे, गणेश भोकरे, आशिष देवधर, राजाभाऊ सूर्यवंशी, प्रकाश ढमढेरे, मनोज जगदाळे, मनीषा कावेडिया, भारती जगदाळे, नीलेश हांडे, राज कुंजीर, जयश्री पाथरकर, प्रिया सूर्यवंशी इच्छुक आहेत. काँग्रेसकडून सतीश देसाई, गोपाळ तिवारी, सतीश मोहळ, नीता रजपूत, प्रकाश पवार, विलास वाडेकर, संगीता पवार, बाळासाहेब मालुसरे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील खाटपे, प्रशांत गांधी, विजया दहिफळे, संजय मते, सुरेश बांदल, पुष्पा गाडे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून निरंजन दाबेकर, मयूर कडू, मनीषा धारणे, राजाभाऊ भिलारे, नितीन परदेशी इच्छुक आहेत. (प्रतिनिधी)प्रभाग क्रमांक १५ : शनिवार पेठ- सदाशिव पेठप्रमुख परिसर : शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ (पार्ट), सुभाष नगर, माडीवाले कॉलनी, शनिवार वाडा, महात्मा फुले मंडई, नूतन मराठी विद्यालय, सदाशिव पेठ (पार्ट), राजा दिनकर केळकर संग्रहालय, कबीर बाग, अहिल्यादेवी हायस्कूल मुलींची, हुजूरपागा, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, तुळशीबाग, शनिपार, रेणुका स्वरुप शाळा, भावे हायस्कूल, भरत नाट्य मंदिर, टेलिफोन एक्स्चेंज (बाजीराव रोड) इ.लोकसंख्याएकूण लोकसंख्या-७२८३३अनुसूचित जाती-८२१अनुसूचित जमाती-४८९आरक्षण अ) इतर मागास प्रवर्गब) इतर मागास प्रवर्ग महिलाक) महिलाड) खुला