गुंजवणी प्रकल्पाच्या कामाचे महाविकास आघाडी श्रेय घेत असल्याबाबत भोर तालुका भाजपच्या वतीने केळवडे (ता. भोर) येथे पत्रकार परिषद घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाळासाहेब गरूड, भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, माजी अध्यक्ष विश्वास ननावरे, पुणे जिल्हा सचिव अशोक पांगारे, कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे, उपाध्यक्ष विजय चौधरी, विद्यार्थी आघाडीचे नीलेश कोंडे, नीलेश पांगारे, अभिजित कोंडे आदी उपस्थित होते.
या वेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी व काँग्रेसने हा प्रकल्प १५ वर्षे अपूर्ण ठेवला होता, तेव्हा जलसंपदा खाते राष्ट्रवादीकडे होते, तेव्हा प्रकल्प पूर्ण न करता आता श्रेयासाठी चढाओढ करत आहेत. गुंजवणी प्रकल्पाचा पंतप्रधान सिंचन योजनेमध्ये समावेश करून देशातील पहिला हायड्रोप्रेशर प्रकल्प म्हणून सर्वांत जास्त मदत आणि निधी भाजप सत्तेत असलेल्या केंद्र सरकारने केली आहे. महाविकास आघाडी भाजपाला डावलून गुंजवणी प्रकल्पाच्या कामाचे श्रेय घेत आहे ते करू नये. वाजेघर, वांगणी व शिवगंगा खोरे उपसा सिंचन योजनांसाठी गुंजवणी पाणी संघर्ष समितीच्या मागणीनुसार १९ मार्च २०१८ रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मान्यता दिली व पुढे कार्यवाही झाली. त्यामुळे या योजनांच्या मंजुरीचे श्रेयही महाविकास आघाडी सरकारने घेऊ नये. हे भाजपचेच श्रेय आहे.
.