भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मंचर येथे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. डेंग्यू, कचरा व्यवस्थापन तसेच पाण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी उपसरपंच युवराज बाणखेले, ग्रामपंचायत सदस्य कैलास गांजाळे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा व्यवस्थापन करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करून मंचरला कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प उभारण्यासाठी सर्वपक्षीय, तसेच मंचरमधील सर्व सामाजिक संघटना मंचर ग्रामपंचायतला मदतच करतील असे सांगितले. यावेळी तालुका संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, मंचर शहराध्यक्ष नवनाथ थोरात, सुरेश अभंग, प्रशांत बाणखेले, राहुल बाणखेले, रोहन खानदेशे, सुशांत थोरात, तुषार बाणखेले, सिद्धप्पा पुजारी, गणेश पारधी, आकाश पारधी, अमोल खंडागळे,सुनील काळे आदी कार्यकर्ते सदर ढोल बजावो आंदोलनाला उपस्थित होते.
०९ मंचर
ढोल बजाओ आंदोलन करताना भाजपचे पदाधिकारी.