पुणे: हवेली तालुक्यात बहुतांशी सोसायटी, ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. भाजप म्हणून खुला प्रचार केला तर ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे विकास दांगट यांच्या माध्यमातून भाजप हवेली बाजार समितीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना जनताच मतदानाच्या माध्यमातून दाखवून देईल. तसेच विकास दांगट यांना भविष्यात भाजपा आमदारकीची उमेदवारी देण्याचं गाजर दाखविण्यात आले आहे. अशी चर्चा सध्या जनेतेत आहे." त्यामुळेच ते भाजपसोबत छुपे गेले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी केला आहे.
बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, दिलीप बराटे, प्रकाश म्हस्के यांच्यासह उपस्थित होते.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल व अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी यामध्ये जोरदार लढत रंगणार असल्याने एकमेकांच्या वर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. सर्वपक्षीय पॅनेलमधून राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण केले आहे. एकप्रकारे राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचेच आव्हान, असेच चित्र असल्याचे स्पष्ट होत आहे.
''वीस वर्षे हे झोपले होते का बाजार समितीची ही निवडणूक कोर्टाकडून लागली आहे. हे लोक नेत्यांची दिशाभूल करत जनतेची ही दिशाभूल करीत आहेत असा आरोप विकास दांगट यांनी केला.''