भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात भाजपचे आध्यात्मिक विकास आघाडीचे प्रमुख संजय महाराज घुंडरे, आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया, गटनेते पांडुरंग वहिले, बंडू काळे, आकाश जोशी, सचिन काळे, प्रमोद बाफना, भागवत काटकर, माऊली बनसोडे, सागरसिंह गड्रेल उपस्थित होते.
संजय घुंडरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे राज्यात सरकार असताना शेतकऱ्यांना कधीही वीजबिल भरण्याची सक्ती केली नाही व वीजग्राहकांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागला नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरी वीजबिल भरण्याच्या मनस्थितीत नाही. शहराध्यक्ष येळवंडे म्हणाले, महाविकास आघाडीचे ऊर्जामंत्र्यांनी राज्यातील जनतेला शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. कोरोनाकाळात अवाजवी वीजबिल आल्यावर ती बिले भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. मात्र, आजवर ते पाळले गेले नसल्याने ती घोषणा फसवी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यामुळे याचा विरोध म्हणून भाजपच्या वतीने टाळे ठोको आंदोलन केले आहे.
फोटो ओळ : आळंदीत महावितरण कार्यालयाला टाळे ठोकताना भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते.