शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पाण्यामुळे पळाले भाजपाच्या तोंडचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 3:02 AM

विरोधकांनी पकडले पेचात : मंत्री, आमदार, महापौर मौनात; पाण्याबाबत भूमिका करेनात स्पष्ट

पुणे : शहराच्या पाणी पुरवठ्याने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी भाजपाला जेरीस आणले असून त्याला भाजपाचाच मित्र पक्ष असलेली शिवसेना व मनसे फोडणी देत आहेत. त्यामुळे पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर व भाजपाचे शहराध्यक्ष असे भाजपाचे शहरातील सगळे पदाधिकारी मौनात गेले असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

शहरात सगळीकडे भाजपाचीच सत्ता आहे. खासदार अनिल शिरोळे भाजपाचे आहेत. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचेच वर्चस्व आहे. त्यातील गिरीश बापट पालकमंत्री आहेत तर दिलीप कांबळे समाजकल्याण राज्यमंत्री आहे. त्याशिवाय माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, विजय काळे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर हे आमदार आहेत. शहराचा कणा असलेल्या महापालिकेत भाजपाचे ९८ निवडून आलेले तर ३ स्वीकृत असे तब्बल १०१ नगरसेवक आहेत. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते अशी सर्व महत्त्वाची पदे भाजपाकडे आहेत. इतके मोठे राजकीय वर्चस्व असूनही भाजपाला पुण्याच्या पाण्याने बेजार केले आहे. पाण्याचा कोटा वाढवल्याशिवाय संपूर्ण शहराला पाणी पुरवणे शक्य नाही व सरकारकडून कोटा वाढवून आणणे पदाधिकाऱ्यांना शक्य होत नाही. त्यातच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेला वार्षिक ८.१९ टीएमसीप्रमाणे म्हणजे दररोज ६३५ दशलक्ष लिटर पाणी देण्याचा आदेश बजावला आहे. त्यात सुधारणा म्हणून ११.५० दशलक्ष लिटर पाणी घ्यावे, असा जलसंपदाचा आग्रह आहे. महापालिका दररोज १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे व तरीही ते संपूर्ण शहराला पुरेसे होत नाही. ऐन दिवाळीत पाणीटंचाईची ओरड होऊन त्यानंतर शहराला रोज एकवेळ पाणी पुरवठा सुरू झाला. आता तर एकदिवसाआड पाणी देण्याची चर्चा होत आहे. त्यामुळेच नागरिक धास्तावले असल्याचे दिसते आहे. ही सगळी स्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला आंदोलनांचा घेरावच घातला आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे बिगूलच या रोजच्या आंदोलनातून फुंकले जात आहे. काँग्रेसही आता यात उतरली आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी थेट पालकमंत्र्यांच्या विधानसभा मतदार संघात नुकतेच पाण्यासाठी भजन-गायन आंदोलन केले. पालकमंत्र्यांना सुबुद्धी दे, म्हणून गणपतीची यावेळी आरती करण्यात आली. काँग्रेसमधील सगळे गट-तट या आंदोलनाला मतभेद विसरून जमा झाले होते हे विशेष! राज्यात भाजपाचीच सत्ता असून येथील सत्ताधाºयांना पुण्यासाठी साधा पाणी कोटा मंजूर करून आणता येत नाही, अशी टीका सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्याकडून केली जाते. पक्षनेतृत्त्वानेच आपल्या शहरातील शाखांना वातावरण पेटते ठेवण्याबाबत आदेश दिले असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच रोज किमान एक याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करताना दिसत असून त्यात भाजपाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जातात.

शहरातील भारतीय जनता पार्टी यामुळे बेजार झाली आहे. त्यामुळेच बहुधा पालकमंत्र्यांसह सर्वच पदाधिकाºयांनी मौनात जाणे पसंत केले. एरवी विविध विषयांवर सातत्याने मतप्रदर्शन करणारे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही शांत बसणेच पसंत केले आहे. पाण्याची समस्या सुरू झाली त्यावेळेपासून पालकमंत्र्यांनी या विषयावर जाहीरपणे बोलणे टाळले आहे. महापौरांसह सर्वच पदाधिकारी ‘पुण्याचे पाणी कमी होऊ देणार नाही’ असे सांगतात. मात्र, ते कसे साध्य करणार, हे सांगितले जात नाही. जलसंपदा महापालिकेला पत्रावर पत्र पाठवत आहे व महापालिकेकडून त्यावर काहीही केले जात नाही. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीरपणे हा प्रश्न राजकीय झाला असून त्यावर प्रशासन काहीच निर्णय घेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळेच तर भाजपाची आणखीनच राजकीय पंचायत झाली आहे.शिवसेना, मनसेही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतकाँग्रेसने शहरातील सर्व चौकांमध्ये निषेध आंदोलन केले. गिरीश बापट व अजित पवार यांची तुलना करणारे व पवार यांनी ऐन दुष्काळातही पुणयाचा पाणी पुरवठा कधी कपात केली नाही, अशा आशयाचे फ्लेक्स शहरात सर्वत्र लावण्यात आले होते. पाण्याच्या प्रश्नावरून भाजपाला राजकीय पेचात पकडण्याचा प्रयत्न सर्व पक्षांकडून केला जात आहे. त्याला शिवसेना व मनसे या पक्षांकडून फोडणी दिली जाते. शिवसेनेचे विजय शिवतारे जलसंपदा राज्यमंत्री आहेत. तरीही शिवसेनेकडून भाजपाला धारेवर धरले जात आहे.

टॅग्स :Puneपुणे