शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
2
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
3
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
4
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
5
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
6
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
7
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
8
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
9
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
10
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
11
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
12
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
13
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
14
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
15
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
16
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
17
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
18
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
19
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
20
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या

BJP चा नागपूर, पुण्याचा विकास पहिल्या पावसातच रस्त्यावर; माजी क्रीडामंत्री सुनिल केदारांची टीका

By अजित घस्ते | Published: May 11, 2024 5:33 PM

पुण्यात पाऊस पडल्यानंतर मी रस्त्याने फिरलो त्यावेळी पुण्याचा विकास कुठे आहे हे शोधू लागलो, असा उपरोधिक टोला माजी क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी लावला....

पुणे : देश भरात विकासाच्या नावे भाजपा मतदान मागत आहे. काल दीड तासाच्या पावसात पुण्यात रस्त्यांवर पाणीत पाणी पाहिले, महापौरांनी काय विकास केला आहे? पुण्यात ही आवस्था तर नागपुरात तर घरात पाणी शिरते असा विकास केला असेल तर जनतेकडे विकासाच्या नावे मत मागत आहे? पुण्यात पाऊस पडल्यानंतर मी रस्त्याने फिरलो त्यावेळी पुण्याचा विकास कुठे आहे हे शोधू लागलो, असा उपरोधिक टोला माजी क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी लावला.

पावसाळा सुरु झाल्यावर पुण्यातील रस्त्यांची ही अवस्था असेल तर कसला विकास केला. वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम करणा-यांनी काय विकास केला. पुण्यातून वाहण्या-या नदीची काय अवस्था आहे. ही नदी आहे की काय आहे असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे विकासावर बोलणा-यांना पुणेकरांनी समाचार घेतलाच पाहीजे असे प्रखंड मत माजी क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केदार बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, सुनील माने उपस्थित होते.

केदार म्हणाले, भाजप केरळमध्ये का वाढत नाही. शिक्षण असल्याने केरळात भाजप वाढत नाही. देशातील पहिले क्रीडा विद्यापीठसाठी मंजूरी मिळाली होती. मात्र या सरकारने गेले दोन वर्ष काहीच केले नाही. त्यामुळे भाजपाला पुणेकरांनी धडा शिकवावा. यावेळी सुनील माने म्हणाले की, पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीची समस्या भेडसावत आहे. महापालिकेत समाविष्ठ केलेल्या गावांमध्ये पाणी व इतर सुविधा मिळत नसल्याचे भयानक वास्तव आहे. तर मागासर्गीयांचे ५५० कोटीचा निधी कोठे खर्च केला. तो कुठे पळवला याचा ही भाजापानी हिशोब द्यावा. भाजपा विकासाच्या नावे गप्पा मारू नये.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारcongressकाँग्रेसravindra dhangekarरविंद्र धंगेकरpune-pcपुणे