पालिकेने पाणीपट्टी थकविणाऱ्या थकबाकीदारांची यादी जाहीर केली. यात आस्थापना, व्यक्ती व व्यावसायिकांचा समावेश आहे. पालिकेच्या तिजोरीत जमा होणारा पैसा जनतेचा आहे. जनतेच्या हितासाठीच हा पैसा खर्ची पडायला हवा. सर्वसामान्य पुणेकरांसाठी असलेले नियम नेत्यांसह सत्ताधाऱ्यांना लागू आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपाने काकडे आणि राणे यांच्याकडील थकबाकी वसूल करावी, अशी मागणी होत आहे. काकडे यांच्याकडे ६६ लाख रुपये तर राणे यांच्याकडे १७ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, पालिकेने २०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे म्हटले असले, तरी हा आकडा साडेपाचशे कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. यात अनेक मोठे मासे आहेत. “सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे संजय काकडे व नीलेश राणे यांच्यावर कारवाई होईल का? प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही बाब खपवून घेणार का,” असा प्रश्न जगताप यांनी केला आहे.