पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 10:36 AM2020-10-10T10:36:59+5:302020-10-10T10:37:36+5:30
पंधरापैकी ११ भाजप, ३ राष्ट्रवादी तर एक अध्यक्षपद काँग्रेसकडे
पुणे : पुणे महापालिकेच्या १५ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. एकूण १५ प्रभाग समिती अध्यक्षांपैकी ११ जागा भाजपच्या वाट्याला आल्या असून, यातील ५ जागांची निवडणुक बिनविरोधच झाली होती. उर्वरित जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शुक्रवारी भाजपला ६, राष्ट्रवादी काँग्रेसला ३ तर काँग्रेसला एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे.
या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब भागडे पीठासीन अधिकारी होते. ही संपूर्ण निवडणुक प्रक्रिया शुक्रवारी स्थायी समिती सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. यात ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय प्रभाग समितीची निवड ही चिठ्ठी टाकून करण्यात आली. यामध्ये काँग्रेसच्या चाँदबी हाजी नदाफ या विजयी झाल्या. या प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे सदस्य आहेत. त्यामुळे समान सदस्य असल्याने येथे चिठ्ठीव्दारे निवड करण्यात आली.
इतर प्रभाग समिती व अध्यक्षपदाची नावे पुढील प्रमाणे : औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय : अर्चना मुसळे, बिनविरोध (भाजप), शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय : सोनाली लांडगे, बिनविरोध (भाजप), सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय : अश्विनी पोकळे, बिनविरोध (भाजप), बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय : राजश्री शिळीमकर, बिनविरोध (भाजप), वानवडी रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय : हमीदा अनिस सुंडके, बिनविरोध (राष्ट्रवादी), कोंढवा - येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय : राणी भोसले, (भाजप), कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय : योगेश समेळ, (भाजप), येरवडा - कळस - धानोरी क्षेत्रिय कार्यालय : ऐश्वर्या जाधव, (भाजप), कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय : हर्षाली माथवड, (भाजप), नगररोड - वडगांवशेरी क्षेत्रिय कार्यालय : संदीप जऱ्हाड, (भाजप), धनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय : स्मिता कोंढरे, (राष्ट्रवादी), वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय : राजाभाऊ बराटे (भाजप), हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय : गणेश ढोरे, (राष्ट्रवादी), भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय : विजयालक्ष्मी हरिहर(भाजप).
---------------------------------